यंदा वारी तर नाही पण 'विठूराया'चा गजर घुमणार रुपेरी पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

अनेक वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारीदेखील यावर्षी खंडीत झाली आहे. केवळ वारकरी संप्रदायच नाही तर अनेकांच्या मनात या वारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

मुंबई : सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारीदेखील यावर्षी खंडीत झाली आहे. केवळ वारकरी संप्रदायच नाही तर अनेकांच्या मनात या वारीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र यावर्षी ही वारी होणार नसली तरी मराठीच्या रुपेरी पडद्यावर ही वारी पाहायला मिळणार आहे. चित्रपटगृहे सुरू झाली की निर्मल...एनरूट नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे आणि यामध्ये वारीचे दर्शन सगळ्यांना होणार आहे.

हेही वाचा : वीजबिल जास्त येण्यामागची 'ही' आहेत कारणं, 'म्हणून' बसलाय तुम्हाला वीजबिलाचा शॉक

दिग्दर्शक ऋषी देशपांडेने निर्मल...अनरूट हा मराठी चित्रपट बनविलेला आहे. हा चित्रपट मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जून महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु लॉकडाऊमुळे आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. चित्रपटगृहे सुरू होताच तो प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण कथाच वारीमध्ये घडते. त्यामुळे सन 2018 मध्ये या चित्रपटाचे संपूर्ण युनिट वारीमध्ये सहभागी झाले होते. आपल्या माऊलीच्या भेटीसाठी आसुसलेल्या एका मुलीचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. या चित्रपटाला विविध चित्रपट महोत्सवात पुरस्कारही लाभलेले आहेत. सुमित तांबेने हा चित्रपट लिहिला आहे. अमेय चव्हाण सिनेमॅटोग्राफर आहे. अंकुर राठी, केतकी नारायण, रोहित कोकाटे, सतीश पुळेकर आदी कलाकारांनी यामध्ये काम केले आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

वारकरी-गावकऱ्यांनी सहकार्य केले
दिग्दर्शक ऋषी देशपांडे म्हणाला, की या चित्रपटाची नायिका समायरा, जिला लहानपणी अनाथाश्रमामधून दत्तक घेतलंय, ती आता ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, अनाथाश्रमाचा पत्ता शोधून तिला तिच्या खऱ्या आई-वडिलांना भेटायचंय, त्यामुळे ती माऊलींच्या वारी सोबत निघाली आहे. भेट होते की नाही ते लवकरच समजेल प्रेक्षकांना. आम्ही चौदा दिवसांचे चित्रीकरण वारीमध्ये केलेले आहे. सासवड ते पंढरपूर असा आम्ही वारीचा प्रवास केला आहे. वारीतील अनुभव खूप चांगला होता. आम्हाला वारकऱ्यांनी तसेच आजूबाजूच्या गावकऱ्यांनी खूप सहकार्य केले. चित्रीकरणात कोणताही व्यत्यय आला नाही.

entertainment news new marathi film release on pandhari vari read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: entertainment news new marathi film release on pandhari vari read full story