...आणि ट्विंकलला तब्बल 46 वर्षात पहिल्यांदा मिळालं आईच्या हातचं जेवण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 31 मे 2020

  • ट्विंकलसाठी आई डिंपल कपाडियाने बनवले जेवण,
  • ४६ वर्षांत पहिल्यांदाच ट्विंकलला मिळालं आईच्या हातच जेवण

 

मुंबई : सर्वसामान्यांसह बॉलिवूड स्टारसुद्धा कोरोना विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये त्यांच्या घरात बंदिस्त आहेत. नवीन काहितरी शिकण्याच्या ते प्रयत्नात आहेत. आणि त्याच गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना सरप्राईज देत असतात. अभिनेत्री ट्विंकल खन्ना देखील या काळात सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. रूपेरी पडद्यापासून ती दूर असली तरही ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या नेहमीच संपर्कात असते. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट शेअर केला आहे. हा फोटो पाहून आणि यावरील कॅप्शन वाचून सर्वांनाच नवल वाटले आहे. हा फोटो आहे तिची आई डिंपल कपाडियाने तिच्यासाठी बनवलेल्या एका पदार्थाचा. विशेष म्हणजे  ट्विंकलला ४६ वर्षात पहिल्यांदाच तिच्या आईच्या हातचं जेवण जेवायला मिळाले असल्याचे या फोटोद्वारे तिने सांगितले आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे.

कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत तिला ४६ वर्षांत पहिल्यांदाच तिची आई डिंपल कपाडिया यांच्या हातचं जेवण जेवायला मिळालं आहे. ट्विंकलने तिची आई डिंपल यांनी बनवलेल्या फ्राईड राईसचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. एवढंच नाही तर फोटो शेअर करत कॅप्शनद्वारे तिने तिच्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले आहे की,'माझ्या आईला हे बनवायला ४६ वर्ष लागली, लॉकडाऊन वाढल्यामुळे माझ्या आईने पहिल्यांदा तिच्या हाताने माझ्यासाठी फ्राईड राईस बनवला आहे. आता मला ही कळलं की 'आईच्या हातचं जेवण' याचा अर्थ नक्की काय असतो.' 
तिचं हे कॅप्शन वाचून तिच्या चाहत्यांना आश्चर्य वाटलं पण त्यांना तितकाच आनंद झाला आहे शेवटी ट्विंकलला तिच्या आईच्या हातचं जेवण जेवायला मिळालं. या फोटोवर अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमणची पत्नी अंकिताने देखील कॉमेंट केली आहे. तिने लिहिले की,'कोणतेही चांगल काम करण्यास कधीही उशीर होत नाही.'  याआधी ट्विंकलने तिचा मुलगा आरवचे कुकिंग टॅलेंट देखील सोशल मीडियावर दाखवले होते. आरवने बनवलेल्या केकचा फोटो ट्विंकलने शेअर केला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twinkle khanna ate mothers hand for the first time in 46 years dimple kapadia made fried rice