ट्विंकल खन्नाने दाखविला 'टॉयलेट पार्ट 2'

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

अक्षय कुमारच्या टॉयलेट या चित्रपटात शौचालयाबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती होत आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईच्या किनाऱ्यावर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे छायाचित्र ट्विंकल खन्नाने कैद केले आहे.

मुंबई - अभिनेता अक्षय कुमार याचा 'टॉयलेट एक प्रेम कथा' हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला असतानाच त्याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर शौचास बसलेल्या व्यक्तीचा फोटो ट्विटरवर अपलोड करत 'टॉयलेट पार्ट 2' असे त्याला नाव दिले आहे.

अक्षय कुमारच्या टॉयलेट या चित्रपटात शौचालयाबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. या चित्रपटातून स्वच्छ भारत अभियानाबाबत जनजागृती होत आहे. मात्र, दुसरीकडे मुंबईच्या किनाऱ्यावर उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे छायाचित्र ट्विंकल खन्नाने कैद केले आहे. ट्विंकल खन्नाने छायाचित्रासह ट्विटरवर लिहिले आहे, की गुड मॉर्निंग, मला वाटतेय की 'टॉयलेट एक प्रेम कथा' चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा पहिला सीन हाच होऊ शकतो.

अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाचे हे ट्विट पाहिले की नाही याबाबत साशंकता आहे. अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेम कथा'ने आतापर्यंत शंभर कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Web Title: Twinkle Khanna flushes Maha govt claims, releases ‘Toilet Ek Prem Katha’ sequel