Twinkle Khanna: 'मुलं जन्माला घालण्याआधी..', पालकत्त्वावर ट्विंकल खन्नाचं मोठं विधान

ट्विंकल खन्ना अभिनयामुळे जितकी चर्चेत आली नसेल तितकी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आलेली दिसते.
Twinkle Khanna
Twinkle KhannaInstagram

Twinkle Khanna: ट्विंकल खन्नानं अभिनयातून भलेही निवृत्ती घेतली असली तरीही लेखिका म्हणून तिनं आपला असा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे. आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर ट्विंकल खन्ना फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

एवढंच नाही तर अनेक वेगवेगळ्या मुद्दयांवर ती आपली मतं मांडताना देखील दिसते. नुकतीच तिनं सोशल मीडियावर आपली एक मुलाखत पोस्ट केली आहे.

ज्यामध्ये ती पालकत्त्वावर बोलताना दिसत आहे. तिनं आपली मुलं आरव आणि नितारा विषयी देखील त्या मुलाखतीत बातचीत केली आहे. तिनं आपल्या मुलाखतीत आई-वडीलांना मुलांना जन्म देण्याआधी ट्रेनिंग देणं गरजेचं आहे,यावर काही थेट मतं मांडली आहेत. (Twinkle Khanna on parenting says parent needs training)

Twinkle Khanna
Nora Fatehi On Lovelife: प्रेमाविषयी मोठी गोष्ट बोलून गेली नोरा; म्हणाली,'माझ्या आयुष्यात..'

ट्विंकल खन्नानं आपली मुलं आणि त्यांच्या पालनपोषणाविषयी देखील आपली मतं मांडली. ती म्हणाली की, ''मुलांचं संगोपन करताना त्यांना कोणत्याही गोष्टीचं उदाहरण देत समजावनू सांगणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल मुलींना वाढवताना जितकं डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं जातं तेवढं मुलांना वाढवताना केलं जात नाही या प्रश्नावर ट्विंकल खन्ना म्हणाली, ''मी मुलांचं संगोपन योग्य पद्धतीनं कसं करावं यावर एक कॉलम लिहिला होता''.

''फक्त मुलींचं संगोपन करताना जास्त लक्ष द्यावं आणि मुलांकडे लक्ष देऊ नये हे मला पटत नाही. जर मला कुणी विचारेल तर मी सांगेन की,जसं तुम्हाला ट्रेनिंग देऊन, टेस्ट पास केल्यावरच गाडीचं लायसन्स मिळतं तसंच आई-वडील होऊ इच्छिणाऱ्यांना देखील बाळाला जन्म देण्याआधी ट्रेनिंगची गरज आहे''.

Twinkle Khanna
Sushant Singh Rajput ला सर्वात जास्त भीती वाटायची ती मृत्यूची; म्हणालेला,'3 तासासाठी जरी झोपलो तरी..'

ट्विंकलनं पालकत्वा संबंधित काही टीप्स देताना मुलांना कुठलीही गोष्ट समजवून सांगताना योग्य उदाहरण देऊन सांगितली तर त्यांना ती लगेच पटेल यावर अधिक भर दिलेला दिसून आलं.

समाजात चांगला बदल घडवून आणण्यासाठी पुढची पिढी कशी तयार करावी यासंबंधित सांगताना मात्र ट्विंकल म्हणाली,''याची तर मी देखील वाट पाहतेय.. आता माझी मुलं कशी घडतायत हे पाहिल्यावरच मी याचं उत्तर देऊ शकते''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com