Koffee With karan 7: रणवीर सिंगचा राग-राग करतो टायगर श्रॉफ,करण समोर केलं कबूल

'कॉफी विथ करण'च्या सातव्या सिझनच्या नवीन भागात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेननच्या लव्हलाईफ विषयी झालेले खुलासे चक्रावून टाकणारे आहेत.
'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless
'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless Google

Koffe With Karan 7: 'कॉफी विथ करण 7' चा नवीन एपिसोड घेऊन करण जोहर (Karan Johar) येतोय. आता करणनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये गेस्ट म्हणून आलेले दिसतायत टायगर श्रॉफ(Tiger Shroff) आणि कृती सेनन. २०१४ मध्ये 'हिरोपंती' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला टायगर आणि कृती लवकरच 'गणपत' या आणखी एका सिनेमातून लोकांसमोर येण्यासाठी सज्ज आहेत.('koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless)

'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless
Boycott Brahmastra साठी मिळालं मोठं कारण, गोमांसविषयी बोलताना चुकलेलाच रणबीर

'कॉफी विथ करण' च्या शो मध्ये पोहोचलेला टायगर व्हाईट शर्टवर यलो सूट घालून एकदम झकास दिसत आहे. टायगरनं घातलेले स्टायलिश सनग्लासही त्याचा लूक डॅशिंग बनवत आहेत. तर त्याच्यासोबत गेस्ट म्हणून आलेली कृती सेनन हॉट पिंक रंगात सर्वांच्या नजरा वेधून घेताना दिसत आहे.

कॉफी विथ करणच्या ७ व्या सिझनमध्ये करण जोहर ओरिजनल 'हिरोपंती'च्या या कपलचं स्वागत करताना दिसत आहे. आणि मग सुरु होतो प्रश्वोत्तराचा मजेदार,चटपटीत धमाल खेळ

'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless
'त्याक्षणी मला कशाचीच पर्वा नव्हती...'; सीमा सजदेहचा घटस्फोटाविषयी मोठा खुलासा

पहिल्याच प्रश्नाला कृतीचं उत्तर ऐकून करणचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. तो कृतीला विचारतो की हिरोपंती सिनेमातून पदार्पण करण्याआधी तीला रिजेक्शनचा सामना करावा लागला आहे का? याचं उत्तर देताना कृती म्हणताना दिसते,'तुम्हाला माहित आहे का माझी पहिली ऑडिशन कशासंदर्भात होती?' कृती पुढे सांगते,'स्टुडंट ऑफ द इयरच्या पहिल्या भागासाठी मी ऑडिशन दिली होती.' आणि हे उत्तर ऐकून करण 'आ' वासून तिच्याकडे पहायला लागतो.

आता हे आपल्या सर्वांना माहितच असेल की नपोटिझमच्या मुद्द्यावर करणला चांगलेच सगळ्यांनी सुनावले होते. २०१२ मध्ये आलेल्या 'स्टुंडंट ऑफ द इयर' मध्ये करणने दोन बॉलीवूड किड्सना संधी दिली होती. एक आलिया भट्ट आणि दुसरा वरुण धवन . त्यानंतर करणवर नेपोटिझमचा आरोप लावला गेला होता.

'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless
'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless Google

त्यानंतर शो मध्ये करणची गाडी लव्ह-अफेअर्सवर घसरताना दिसत आहे. तो विचारताना दिसतोय की,'सिनेमात एकत्र पदार्पण केल्यानंतर तुम्हाला एकमेकांविषयी काही फिलिंग वाटल्या होत्या का? तर कृतीला करण विचारताना दिसतोय की टायगरनं तिला कधी डेटिंगसाठी विचारलं नाही याचं तिला वाईट वाटतं का?'

त्यावर टायगर पटकन म्हणाताना दिसत आहे की, 'कृती ऑलरेडी कोणाच्या तरी प्रेमात आहे'. त्यावर कृती म्हणाली,'तिनं टायगरला डेट केलं नाही कारण तो खूप 'फ्लिप' करतो. आता कृतीचा इशारा टायगरच्या जिमनॅस्टिकनं भारलेल्या अॅक्शनकडे आहे की प्रेमप्रकरणात तो हवं तेव्हा पलटी मारतो याकडे आहे हे पूर्ण एपिसोड पाहिल्यावर समजेलच.

'koffee with karan7' promo tiger shroff envies ranveer singh,karan johar speechless
'मुल जन्माला घालण्याआधीही परवानगी घ्यायची का?'; सुबोध भावे स्पष्टच बोलला...

'कॉफी विथ करण ७' च्या या भागातील रॅपिड फायर राऊंडचा देखील एक प्रोमो सध्या लक्ष वेधून घेत आहे. करण जोहर या राऊंडमध्ये टायगर श्रॉफला प्रश्न विचारताना दिसत आहे की,'ती एक कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तो रणवीर सिंगवर जळतो,त्याचा राग राग करतो?',तेव्हा उत्तर देताना टायगर लगेच म्हणतो,'त्याची बायको,दीपिका पदूकोण'. या उत्तराचं स्पष्टिकरण देताना टायगर म्हणतो,'रणवीरची बायको दीपिका खूप टॅलेन्टेड आहे आणि सुंदरही...',हा प्रोमो इथे बातमीत जोडलेला आहे.

'कॉफी विथ करण' च्या ७ व्या सिझनमधील हा नवा प्रोमो चाहत्यांचा उत्साह नक्कीच वाढवताना दिसत आहे. टायगर आणि कृती सननच्या दरम्यान खूप धमाल गप्पा झालेल्या दिसत आहेत. गेल्या भागात कियारा अडवाणी आणि शाहिद कपूर आले होते,ज्यांच्या एपिसोडला अधिक पसंत केलं गेलं. आता पहायचं टायगर आणि कृतीचा हा नवीन एपिसोड चाहत्यांना किती आवडतो. येत्या गुरुवारी १ सप्टेंबरला टायगर आणि कृती सननचा एपिसोड हॉटस्टारवर स्ट्रीम केला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com