आमिर खानच्या शिष्यांची 'मस्ती की पाठशाला' (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

विशेष म्हणजे आमिरने या व्हिडीओची दखल घेत ट्विट केले आहे.

मुंबई : नुकताच शिक्षक दिन झाला आणि अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे आपल्या लाडक्या गुरुवर्यांना शुभेच्छा दिल्यात. अशाच काहीशा पण हटके शुभेच्छा शिक्षक दिनाला अभिनेता आमिर खानलाही मिळाल्या आहेत. 'मस्ती की पाठशाला' या ट्विटरवरील आमिर खान फॅन्स पेजने शिक्षकदिनानिमित्त आमिरला एक व्हिडीओ समर्पित केला आहे. 
 
विशेष म्हणजे आमिरने या व्हिडीओची दखल घेत ट्विट केले आहे. 'वाह! कौन है भाई इस ग्रुप का प्रिंसिपल? ज्यांनी कुणी हा व्हिडीओ बनवला असेल, त्यांना माझे खुप सारे प्रेम..' असे कौतुक करत आमिरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 
 

या व्हिडीओत आमिरच्या सिनेमातील डायलॉग्स्, त्याची सिनेमातील गाजलेली पात्र, सीन्स्, फायटींग सीन्स्, नृत्य यांचा समावेश केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर बराच व्हायरल होत आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twitter page masti ki pathshala tribute to aamir khan