गुड्डु पंडित पैसे कमविण्यासाठी कॉल सेंटरमध्ये जायचा त्यातून त्यानं...  

 twitter trending first salary mirzapur fame ali faizal post on his first salery working in call center
twitter trending first salary mirzapur fame ali faizal post on his first salery working in call center

मुंबई - यशाचे नवीन शिखर गाठल्यानंतर अनेकांना तुमच्या प्रवासाविषयी जाणून घ्यावेसे वाटते. यात केवळ एका ठराविक क्षेत्रांतील लोकांच्या संघर्षमय जीवनाविषयी लोकांना उत्सुकता असते असे नव्हे तर सर्वच स्तरांवर आघाडीवर असणा-या व्यक्तिमत्वांच्या शोधात प्रेक्षक, चाहते असतात. असचं एक व्यक्तिमत्व त्याच्या अभिनयामुळे मागील काही दिवसांपासून सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरलं आहे.

गुड्डु पंडितला आता कोणी ओळखत नाही असे होणार नाही. मिर्झापूरच्या भाग एक आणि दोन मध्ये त्याने केलेल्या अभिनयामुळे तो एकदम प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. ती भूमिका साकारणा-या अली फजलला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. अली फजलच्या या यशामागे असणारा संघर्ष त्याने सांगितला आहे. सध्या काही दिवसांपासून व्टिटरवर First sallery नावाचा हॅशटॅग सुरु आहे. त्यावर अनेकांनी आपआपल्या पहिल्या कमाईविषयी लिहिलं आहे. त्यात अली फजलने लिहिलेल्या अनुभवाला चाहत्यांनी पसंती दिली आहे.

अलीच्या अगोदर प्रसिध्द दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही आपल्या पहिल्या पगाराविषयी लिहिले आहे. प्रत्येकाला सुरुवातीला संघर्ष करावा लागतो. सरतेशेवटी पैसा कमविणे हे सत्य आहे. त्याची गरज दैनंदिन जीवनात जाणवल्याशिवाय राहत नाही. अशावेळी काही ना काही करावे लागते. कष्ट कुणाला चुकलेले नाहीत ते न करता कुणाला जास्तकाळ तग धरता येत नाही. हेही शाश्वत सत्य़ म्हणावे लागेल.

यावर अलीनेही आपल्या पहिल्या पगाराविषयी एक पोस्ट शेयर केली आहे. तो म्हणतो, अलीचा पहिला पगार हा 8 हजार रुपये इतका होता. तो ज्यावेळी 19 वर्षांचा होता त्यावेळी त्याने कामाला सुरुवात केली होती.कॉलेजात शिकताना त्य़ाच्याजवळ पैसे नसायचे तेव्हा त्याने कामाला सुरुवात केली. त्यावेळी तो एका कॉल सेंटरमध्ये काम करायचा.

फी भरायला पैसे हवे असायचे तेव्हा खिशात एकही रुपया नसायचा अशावेळी आपल्य़ा समोर एक मोठा प्रश्न उभा राहायचा. म्हणून कामाला सुरुवात केली. सध्या व्टिटरवर चाललेल्या या नव्या ट्रेंडला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनीही आपण 18 वर्षांचा असताना सातवीत शिकणा-या मुलाची शिकवणी घेऊन पैसे मिळविल्याचे सांगितले. 


 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com