उबंटू या चित्रपटाचा टीझर झाला रिलीज

टीम ई सकाळ
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

अभिनेता पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू या चित्रपटाचा टीझर आज सोशल मीडीयावर रिलीज करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून पुष्कर या चित्रपटावर काम करतो आहे. काही महोत्सवांमध्ये या चित्रपटाला गौरवलेही गेले आहे. 

मुंबई : अभिनेता पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित उबुंटू या चित्रपटाचा टीझर आज सोशल मीडीयावर रिलीज करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून पुष्कर या चित्रपटावर काम करतो आहे. काही महोत्सवांमध्ये या चित्रपटाला गौरवलेही गेले आहे. 

टणटण वाजली घंटा,
वर्गात मुलं जमली...
शाळा बंद होणार नाही,
पोरं ठाम उभी !

शाळेसाठी जिद्दीने लढणाऱ्या मुलांची गोष्ट सांगणारा
'उबुंटू'चा टीझर आला तुमच्या भेटीला...  असे या पोस्टमध्ये नमूद करून हा टीझर लोकार्पण करण्यात आला आहे. 

हा चित्रपट 15 सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून, याचा ट्रेलरही लवकरच येणार असल्याची माहीती या टीझरच्या शेवटी देण्यात आली आहे. 

Web Title: ubuntu marathi film teaser released esakal news