Udit narayan is ready for aditya and neha kakkars marriage
Udit narayan is ready for aditya and neha kakkars marriage

उदित नारायण म्हणाले , 'नेहा आमच्या घरात सुन म्हणून आली तर...'

मुंबई : बॉलिवूडची लाडकी गायिका नेहा कक्कर नेहमीच तिच्या लव्हअफेअर्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तर तीच्याविषयी चर्चांना उधाण येते. सध्या इंडियन आयडॉलच्या सेटवर असे काही किस्से घडतायत की पुन्हा एकदा ती चर्चेत आलीय. या सेटवर चक्क तिचं लग्नच ठरविण्यात आलंय आणि तेही एका ज्येष्ठ गायकाने त्यांच्या मुलासाठीच तिला लग्नाची मागणी घातली आहे. दुसरं तिसरं कोणी नाही तर, उदित नारायण यांनी त्यांचा मुलगा आदित्यसाठी नेहाला मागणी घातली आहे. 

नेहा कक्करला गायक उदित नारायण यांनीच आपल्या मुलासाठी लग्नाची मागणी घातलीय. उदित नारायण यांचा मुलगा आणि इंडियन आयडॉलचा निवेदक आदित्य नारायण याच्यासाठी उदित यांनी नेहाला मागणी घातली आहे. 'हा शो बघण्याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे या शोमधील सर्व स्पर्धक टॅलेंटेड आहेत आणि दुसरं कारण म्हणजे गायिका नेहा कक्करला मी सून म्हणून घरी घेऊन जाण्याचा विचार करतोय.' हे ऐकून नेहा शॉक झाली. तिला याची काहीच कल्पना नव्हती. यात आणखी भर म्हणून नेहा कक्करचे आई-वडिलही सेटवर येतात व आम्हाला आदित्य जावई म्हणून पसंत आहे असं सांगतात.

ही सर्व मस्करी तर सुरु होती पण, उदित नारायण यांनी नेहाला खरचं सुन म्हणून घरी आणण्याची तयारी दाखवली आहे. नवभारत टाईम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याविषयीचा खुलासा केला आहे. नेहा आणि आदित्यविषयी प्रश्न विचारला असता उदित म्हणाले, 'नेहा खरचं खूप गोड मुलगी आहे. तिने तिच्या करीअरमध्ये नाव कमावलं आहे आणि मला ती मुलगी आवडते. दुसरी विशेष बाब म्हणजे नेहा आणि आदित्यची जोडी चांगली दिसते. नेहा जर आमच्या घरची सुन झाली तर मला ते नक्कीच आवडेल आणि आमच्या घरातही एक फिमेल सिंगर अॅड होईल.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com