वयाच्या १३ व्या वर्षात सरोज खान यांनी केलं होतं लग्न, मुलांच्या जन्मानंतर झाला 'या' धक्कादायक गोष्टींचा खुलासा

saroj khan
saroj khan

मुंबई- बॉलीवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सरोज खान यांनी दोन हजारपेक्षा जास्त गाण्यांची कोरिओग्राफी केली होती. मात्र तुम्हाला हे माहित आहे का की इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी त्या बॅकग्राऊंड डान्सर होत्या? सरोज यांनी १९५०च्या दशकातील प्रसिद्ध कोरिओग्राफर बी. सोहनलाल यांच्याकडून डान्सचं प्रशिक्षण घेतलं होतं. आणि नंतर त्यांच्यासोबतंच विवाह केला. बी.सोहनलाल हे सरोज यांच्यापेक्षा ३० वर्षांनी मोठे होते. सरोज त्यांच्या लग्नाच्या वेळी केवळ १३ वर्षांच्या होत्या. एवढंच नाही तर लग्नाआधी त्यांनी इस्लाम धर्म देखील स्विकारला. त्यांचं खरं नाव निर्मला नागपाल होतं.

सरोज खान यांनी त्यांच्या लग्नाबद्दल बोलताना एकदा सांगितलं होतं की लग्नाच्या वेळी त्या शाळेत शिकत होत्या आणि सोहनलाल त्यांचे डान्स प्रशिक्षक होते. त्यांनी त्यांच्या गळात काळा धागा बांधला होता ज्याला लग्नाचं नाव दिलं गेलं. सोहनलाल आधीपासूनंच विवाहित होते आणि सरोज खान या त्यांच्या दुसरी पत्नी होत्या. मात्र सरोज यांना ही गोष्ट त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर कळाली. सोहनलाल यांनी या मुलांना स्वतःचं नाव देण्यास नकार दिला. त्यानंतर हे दोघंही वेगळे झाले. 

१९६३ मध्ये सरोज यांनी एका मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव त्यांनी राजू खान असं ठेवलं. त्यानंतर दोन वर्षांनी १९६५ मध्ये त्यांनी आणखी एका मुलाला जन्म दिला मात्र आठ महिन्यातंच त्याचं निधन झालं. सरोज यांनी पतीपासून वेगळं झाल्यावर मोठ्या हिंमतीने अडचणींचा सामना केला.

सरोज खान यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रिलीज झालेल्या 'गीता मेरा नाम' सिनेमाच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळुन पाहिलं नाही. त्यांना भारतात 'मदर्स ऑफ डांस', 'कोरिओग्राफी की माँ' अशा उपमा मिळाल्या. 

सरोज यांना १९८६ मधील 'नगीना', १९८७ मधील 'मि. इंडिया', १९८८ मधील 'तेजाब', १९८९ मधील 'चांदनी' सारख्या अनेक हिट सिनेमांच्या गाण्यांची कोरिओग्राफी करण्यासाठी पुरस्कार मिळाले. 

unheard things of choreographer saroj khan personal life  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com