प्रियांका चोप्रा सासूसोबत खेळतेय घोडागाडी गेम, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट..

दिपाली राणे-म्हात्रे, प्रतिनिधी
मंगळवार, 14 जुलै 2020

प्रियांकाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात प्रियांका तिच्या सासूसोबत मस्ती करताना दिसतेय. प्रियांकाची तिच्या सासरच्या लोकांसोबत चांगलीच गट्टी जमलेली आपल्याला अनेकदा पाहायला मिळते.

मुंबई- अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रियांका सध्या लॉस एंजेलिसमध्ये तिच्या कुटुंबासोबत आहे. पती निक जोनास आणि कुटुंबासोबत ती चांगला वेळ घालवत आहे. नुकताच प्रियांकाचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यात प्रियांका तिच्या सासूसोबत मस्ती करताना दिसतेय. प्रियांकाची तिच्या सासरच्या लोकांसोबत चांगलीच गट्टी जमलेली आपल्याला अनेकदा पाहायला मिळते.

हे ही वाचा: अभिनेत्री रेखाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का, सुरक्षारक्षक पॉझिटीव्ह आल्यानंतर केली होती कोरोना टेस्ट

प्रियांका आणि तिची सासू डिनीस यांचा हा व्हायरल व्हिडिओ प्रियांका टीम नावाच्या अधिकृत फॅनपेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सासू आणि सून घरात मस्ती करताना दिसतायेत. प्रियांकाचा हा अंदाच पाहून तिचे चाहते नक्कीच खुश होतील. या व्हिडिओमध्ये प्रियांका घोड्यासारखी खिंकाळते आहे आणि तिची सासू तिच्या ड्रेसचे साईडचे दोन पट्टे पकडून तिच्या मागे धावताना दिसतेय. त्यानंतर दोघीही एका खोलीतून दुस-या खोलीत जातात जसं की हॉर्स रायडिंगंच खेळत आहेत. प्रियांकाच्या चाहत्यांना त्यांचा हा सासू-सूनेचा घोडागाडी व्हिडिओ चांगलाच पसंत पडला आहे. 

प्रियांकाच्या सासूचा नुकताच वाढदिवस होऊन गेला. यावेळी प्रियांकाने त्यांना हटके अंदाजात विश केलं होतं. प्रियांकाने तिची सासू डिनीस मिलर जोनस यांच्या वाढदिवशी एक प्रेमळ पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवर केली होती. तिने पती निक जोनास आणि सासू डिनीस यांचा सुंदर फोटो पोस्ट करत लिहिलं, हॅप्पी बर्थ डे मदर इन लव्ह.  

प्रियांका चोप्रा सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. सोशल मिडियावर ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तसंच देसी गर्ल प्रियांकाने भारतात ओटीटी प्लॅटफॉर्मवर देसी कंटेंट उपलब्ध व्हावा यासाठी मल्टिमिलियन डॉलरची डिल देखील केली होती. 

unseen video of priyanka chopra horsing around with her mother in law denise jonas   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unseen video of priyanka chopra horsing around with her mother in law denise jonas