कपिल शर्मा शो फेम उपासना सिंग मिस युनिव्हर्सविरोधात न्यायालयात, कारण की? | Upasana Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Upasana Singh And Harnaaz Sandhu

कपिल शर्मा शो फेम उपासना सिंग मिस युनिव्हर्सविरोधात न्यायालयात, कारण की?

Actor Upasana Singh Move Against Miss Universe Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स हरनाज कौर संधू कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये 'बुआ'ची भूमिका करणारी उपासना सिंगने (Upasana Singh) चंदीगडच्या स्थानिक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. उपासनाने हरनाज संधूवर (Harnaaz Sandhu) तिच्या चित्रपटाच्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

हरनाजकडे कथित कराराचे उल्लंघन केल्यामुळे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. गुरुवारी उपासना सिंगने चंदीगडच्या जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. हरनाजमुळे मोठे नुकसान सहन करावे लागल्याचा दावा तिने केला आहे.(upasana singh moves court against miss universe harnaaz sandhu)

संधूवर लावला आरोप

उपासना सिंग 'बाई जी कुट्टांगे' हा चित्रपट बनवत होती. यात हरनाजची मुख्य भूमिका होती. न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधताना चित्रपट निर्माती सिंग म्हणाली, मी हरनाजला चित्रपट 'बाई जी कुट्टांगे'मध्ये अभिनय करण्याची संधी दिली. (Entertainment News)

तिने दावा केला होता की हरनाजला संतोष एंटरटेनमेंट स्टुडिओ एलएलपीबरोबर आपल्या करारानुसार चित्रपटाच्या प्रचारासाठी स्वतः येणे अपेक्षित होते. मात्र तिने त्यासाठी तारीख देण्यास नकार दिला. २७ मे रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र हरनाजच्या अनुपस्थितीमुळे ती आता १९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.