उर्फीने अक्षयच्या चित्रपटाची उडवली खिल्ली, म्हणाली, का प्रदर्शित झाला? | Javed Urfi Comment On Akshay Kumar Film | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed And Akshay Kumar

उर्फीने अक्षयच्या चित्रपटाची उडवली खिल्ली, म्हणाली, का प्रदर्शित झाला?

Urfi Javed Comment On Akshay Kumar Film : आपल्या बेताल वक्तव्यामुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. आता तिने अभिनेता अक्षय कुमारवर (Akshay Kumar) निशाणा साधला आहे. उर्फीने अक्षयचा चित्रपट रक्षाबंधनवर टीका केली आहे. रक्षाबंधन बाॅक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला आहे. एका मुलाखतीत रक्षाबंधनच्या पटकथेवर सवाल उपस्थित करत उर्फी जावेद (Urfi Javed) विचारते की हा चित्रपट बनवलाच का आहे?

हेही वाचा: Vaani Kapoor : 'शुद्ध देसी रोमान्स'ची वाणी कपूर

उर्फी म्हणते, रक्षाबंधनचे ट्रेलर मी पाहिले. मला वाटले हा चित्रपट ३० वर्षानंतर का प्रदर्शित होत आहे. ती तर ९० व्या दशकात प्रदर्शित व्हायला हवा होता. हा हुंडा काय असतो. बहिणीचे लग्न करायचे आहे. हुंड्याची जमवाजमव करायचे आहे. मला माफ करा. पण हा चित्रपट ३० वर्षांपूर्वीचा आहे. (Bollywood News)

हेही वाचा: अल्लु अर्जुनच्या पुष्पा २च्या चित्रीकरणाला सुरुवात? रश्मिकाने शेअर केला फोटो

आज आपल्याला अशा चित्रपटाची गरज आहे जिथे मुलीने म्हणायला हवे, भावा ऐक तू तुझ काम कर, मी माझे काम करते. माझ्या लग्नाची चिंता करण्याची गरज नाही. मी आपले काम करेल, पैसा कमवेल, खाण-पिण करेल. रक्षाबंधनमधील त्या बहिणींना हे बोलायला हवे होते.

Web Title: Urfi Javed Comment On Akshay Kumar Film Raksha Bandhan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..