Urfi Javed : माझ्या कपड्यांवर शेरेबाजी करायची नाही; उर्फी पत्रकारांवरच संतापली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi javed Latest News

Urfi Javed : माझ्या कपड्यांवर शेरेबाजी करायची नाही; उर्फी पत्रकारांवरच संतापली

Urfi javed Latest News उर्फी जावेद (Urfi Javed) आणि वाद हे समीकरण झाले आहे. यामुळेच उर्फी नेहमी चर्चेत असते. ती कोणत्या ना कोणत्या कारणाने एकप्रकारे वाद ओढवून घेते. नंतर ती दुसऱ्यांना गप्‍प राहण्याचा आणि कमेंट न करण्याचा सल्ला देत असते. तिच्या या सवयीमुळे सोशल मीडियावर (Social Media) नेहमी वाद होत असतो. आता तिने पत्रकारांवरच आपला राग व्यक्त केला. कारण होते कपड्यांचे...

उर्फी जावेद नेहमी आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. कधी प्लॅस्टिक गुंडाळून, कधी सेफ्टी पिनांचा ड्रेस घालून तर कधी गोणपाट गुंडाळून वावरत असते. चित्र-विचित्र कपड्यांमुळे उर्फी नेहमी चर्चेत राहते. यामुळे तिच्या भोवताल फोटोग्राफर्सचा गराडा पाहायला मिळतो. विचित्र कपडे घालणाऱ्या उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते.

हेही वाचा: तारा सुतारियाचा किलर लूक पाहून व्हाल आश्चर्यचकित

ती कोणत्याही ड्रेसमध्ये माध्यमांसमोर येत असते. उर्फी फोटोग्राफर्सना हवे तेवढे फोटोही काढू देते. यामुळे सोशल मीडियावर युजर्स तिला चांगले कपडे घालण्याचा सल्ला देत असतात. मात्र, ऐकणार ती उर्फी कसली. युजर्सनाही उर्फी आपले काम करण्याचा सल्ला देते. आता उर्फी पत्रकार आणि फोटोग्राफर्सवर संतापली. सोशल मीडियावर उर्फीचा (Urfi Javed) व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ती पत्रकार आणि फोटोग्राफर्सवर संतापलेली दिसत आहे.

मी तुमचा मान राखते अन्...

‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमासाठी उर्फी जावेद गेली होती. तेव्हा एकाने ‘ढंग के कपडे पहन के आई है’ असे म्हटले. याचा राग उर्फीने दुसऱ्या कार्यक्रमात फोटोग्राफर्स आणि पत्रकारांवर काढला. ‘मी तुमचा मान राखते. तुम्ही माझ्या कपड्यांवरून शेरेबाजी करता. कपड्यांवरून शेरेबाजी प्रेयसी, आई-बहिणीच्या कपड्यांवर करा. माझ्या कपड्यांवर शेरेबाजी करायची नाही’ अशी उर्फी म्हणाली.

हेही वाचा: राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’; अभिनेत्री पूजा भट्टचे ट्विट चर्चेत, म्हणाली...

उर्फीचा ड्रेसिंग सेन्स रणवीर सिंगला आवडतो

कॉफी विथ करण शो मध्ये अभिनेता रणवीर सिंगने उर्फी जावेदच्या कपड्यांचे कौतुक केलं होते. ‘तिचा ड्रेसिंग सेन्स मला आवडतो. तिचे कपडे हटके असतात’ असे रणवीर म्हणाला होता. रणवीर गंमत करतोय असे शोमध्ये आलेल्या आलिया भट्टला वाटले होते. तिने रणवीरला तू खरं बोलतोयस का? असे विचारले. ‘उर्फीचे कपडे वेगळेच असतात आणि ती एकदा घातलेला ड्रेस पुन्हा घालत नाही’ असे रणवीर म्हणाला.

Web Title: Urfi Javed Dressing Sense Angry On Journalist Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..