Urfi Javed Lifestory: खुद्द वडिलांनी २ वर्षे केला शारीरिक व मानसिक छळ' अशी आहे उर्फीची कहाणी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed lifestory

Urfi Javed: खुद्द वडिलांनी २ वर्षे केला शारीरिक व मानसिक छळ' अशी आहे उर्फीची कहाणी..

सध्या उर्फी जावेद ही तिच्या फॅशनमुळं चर्चेत असते मात्र आता ती चर्चेत असतेच मात्र आता ती भाजप नेत्यामुळं. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरुद्ध पोस्ट केली इतकच नाही तर पोलिस तक्रारही केली.

तर उर्फीही काही कमी नाही तिनेही चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिलं. नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फीची कहानी बरीच त्रासदायक आहे. तिने एका मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल सांगितलं. (Urfi Javed lifestory)

हेही वाचा: Chitra wagh Urfi Javed Controversy: उर्फी जावेदवर चित्रा वाघ का भडकल्या?

उर्फीचा जन्म 15 ऑक्टोबर 1996 रोजी लखनऊमध्ये झाला. तिने आपले सुरुवातीचे शिक्षण लखनऊच्या सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण घेण्यासाठी लखनऊ येथील एमिटी विद्यापीठात प्रवेश घेतला. उर्फीने एमिटी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली आहे.

आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने सांगितले होते की, जेव्हा ती तिच्या शाळेत 11 विच्या वर्गात होती, तेव्हा कोणीतरी तिचे फोटो पोर्नवेबसाइटवर अपलोड केले होते. या कारणावरून वडिलांनी उर्फीचा सुमारे २ वर्षे शारीरिक व मानसिक छळ केला.असा धक्कादायक खूलासा तिनं केला.

हेही वाचा: Urfi Javed: "तुमच्या कामांकडे लक्ष द्या",चित्रा वाघ यांच्या पोस्टला उर्फीचा कडक रिप्लाय

उर्फीने आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की नातेवाईकांकडूनही बरेच काही ऐकावं आहे. त्यामुळे ती आपल्या दोन बहिणींसह घरातून पळून गेली आणि दिल्लीला गेली आणि जवळपास आठवडाभर एका उद्यानात वेळ घालवला. यानंतर तिला कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली, त्यानंतर तिची परिस्थीती सुधारू लागली.

उर्फीचा जन्म एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचं संपूर्ण कुटुंब इस्लामला मानतं. उर्फी जावेदच्या आईचं नाव झाकिया सुलताना असून वडिलांचं नाव माहित नाही. उर्फीच्या आईशिवाय दोन लहान बहिणी आहेत, ज्यांची नावे आसफी जावेद आणि डॉली जावेद आहेत.