Urfi Javed New Video: कपडे संपले आता थेट लाकडाचा ड्रेस.. उर्फीला पाहून नेटकऱ्यांनी जोडले हात

उर्फीनं नुकताचा शेअर केलेला व्हिडीओ पाहून लोकांना आता तिचा टेलर कोण हे जाणून घेण्याचे वेध लागलेयत.
Urfi javed
Urfi javedEsakal

Urfi Javed New Video: उर्फी जावेद खूपच बोल्ड अभिनेत्री आहे..जी नेहमी फॅशनमध्ये नवनवीन प्रयोग करत असते आणि दरवेळेला लोकांना आपल्या अतरंगी फॅशननं शॉक देत असते. आता पुन्हा एकदा उर्फीनं आपल्या नव्या ड्रेसनं लोकांना दिवसा तारे दाखवले आहेत.

उर्फीनं आपला एक नवा व्हिडीओ नुकताच शेअर केला आहे.ज्यातील तिचा ड्रेस पाहून अनेकांना केवळ भुरळ यायची बाकी असेल.

उर्फीनं यावेळी कपड्याचा नाही तर एका वस्तूचा वापर आपला नवा कॉश्युम बनवण्यासाठी केला आहे. उर्फीनं यावेळेला अशा वस्तूचा वापर केलाय ज्याविषयी तुम्ही विचारही करू शकत नाही. चला तिच्या त्या नव्या व्हिडीओवर एक नजर टाकूया..(Urfi Javed New dress made of bamboo basket)

Urfi javed
Kushal Badrike: 'ही दिसते जामची बरणी अन् वागायला उषा नाडकर्णी..', 'या' मराठी अभिनेत्रीवर कुशलनं साधला निशाणा

तुमच्या माहितीसाठी इथं सांगतो की उर्फीनं यावेळी आपलं अंग झाकण्यासाठी ना कपड्याचा वापर केला आहे ना हातांचा. चक्क उर्फीनं यावेळी बांबूच्या टोपल्या घेऊन त्यापासून आपला ड्रेस बनवला आहे.

उर्फीच्या या विचित्र प्रयोगानं सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेच आहेत पण हिच्या डोक्यात या कल्पना येतात कुठून या विचारानं लोकांन हैराण करून सोडलं आहे.

हेही वाचा: नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

या व्हिडीओत आपण पाहू शकता की सुरुवातीला उर्फीनं फक्त बांबूच्या टोपलीचा फोटो दाखवला आहे पण काही वेळानंतर लगेचचं उर्फी या टोपल्यांना तोडून त्यापासून बनवलेला एक ड्रेस घालून दिसते. उर्फीनं या ड्रेसच्या आत स्किन कलरचे अंर्तवस्त्र घातले आहेत. ज्यामुळे हा ड्रेस प्रमाणापेक्षा जरा जास्तच बोल्ड दिसतोय.

Urfi javed
Bhau Kadam Video: भाऊ कदमच्या व्हिडीओचा सोशल मीडियावर कल्ला.. लोक देऊ लागले थेट लग्नाची सुपारी..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com