
Urfi Javed: उर्फी काही नमेना! पोलिस स्टेशनमधून आल्यावर नवीन फॅशनचा अविष्कार
मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी कपड्यांवरून उर्फी जावेदविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. उर्फीवर कारवाई करण्यासाठी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रारही दाखल केली. पुढे काल पोलिसांकडून उर्फीची चौकशीही करण्यात आली. पोलीस स्टेशनमधून घरी आल्यावर काहीच तास झाले नाहीत इतक्याच उर्फीने सोशल मीडियावर नवीन व्हिडिओ पोस्ट करत फॅशनचा नवीन अविष्कार दाखवलाय.
(urfi javed new fashion video going viral on social media after coming from police station)
हेही वाचा: Chitra Wagh : 'जोपर्यंत ती पूर्ण कपडे घालत नाही.....',चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल घेतला मोठा निर्णय
या व्हिडिओत उर्फीने ब्लु थीम करून छोटीशी डान्स स्टेप केली आहे. याशिवाय या व्हिडिओत उर्फीच्या अंगावर पिसाच्या आकाराचा टॅटू सुद्धा दिसतोय. उर्फीने हा नवा व्हिडिओ पोस्ट करून अवघी काही मिनिटं झाली आहेत. पण नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केलाय. काही लोकांनी उर्फीचा हा नवीन व्हिडीओ स्वातंत्र्याचे प्रतीक आहे असं सांगितलं आहे.
चित्रा वाघ यांनी अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेदच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढे काल पोलिसांकडून उर्फी जावेदची कसून चौकशी करण्यात आली. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आल्यावर उर्फी नमेल असं वाटलं होतं. परंतु 'झुकेगा नही साला' असा पवित्रा उर्फीने घेतलेलं दिसतोय.
हेही वाचा: Uorfi Javed Vs Chitra Wagh : उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार; चाकणकर म्हणाल्या...
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली. 'उर्फीवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्णपणे कपडे घालणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. राज्यामध्ये असं विकृतपणे उघडे नागड फिरणं याबाबत मी आवाज उठवला तर काय चूक केली', असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे
उर्फीच्या या नवीन व्हिडिओमुळे आता काय गदारोळ होणार हे काहीच तासात स्पष्ट होईल. या नवीन व्हिडिओमुळे उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.