Urfi Javed: 'दाराची काढली आणि कमरेला बांधली', दिवाळीची लायटिंग लावून आली उर्फी जावेद...

उर्फी जावेद मुंबईच्या रस्त्यांवर एका नवीन अतरंगी कॉश्च्युममध्ये फिरताना दिसली,ज्यात तिनं लायटिंग सारखंच दिसणारं काहीतरी कमरेला गुंडाळलं आहे.
Urfi Javed trolled again for her choice of clothes
Urfi Javed trolled again for her choice of clothesInstagram
Updated on

Urfi Javed: 'बिग बॉस-ओटीटी' फेम उर्फी जावेदआपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद आणि विचित्र फॅशन हे गणित आता चांगलेच जुळले आहे. उर्फी जावेद कपड्यांवर सतत प्रयोग करत असते आणि ट्रोलर्सच्या निशाण्यावर येते.(Urfi Javed trolled again for her choice of clothes)

उर्फी जावेद तिच्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. ती विचित्र ड्रेसिंग स्टाइल करून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.आता पुन्हा एकदा तिच्या बोल्ड स्टाईलनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले दिसून येत आहे.

Urfi Javed trolled again for her choice of clothes
Priyanka Chopra:'लखनऊमध्ये संध्याकाळी सातनंतर बाहेर पडणं म्हणजे..',महिलांच्या सुरक्षेवर प्रियांकाची नोट

उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या कारमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान, पांढरा मोनोकोनी तिनं परिधान केला आहे आणि त्यावर तिने झालर टाईप स्कर्ट घातला आहे. अर्थात तो स्कर्ट कशापासनं बनवला आहे हे उर्फी जाणे. पण त्याला पाहिलं की वाटतंय दिवाळीला दाराला आजकाल जे चायनाहून आलेली तोरणं लावली जातात तेच उर्फीनं गुंडाळलेलं असावं. हो,एक मात्र आहे की उर्फी या ड्रेसमध्ये किलर लूक देत होती. तिने मेकअपही झकास केला होता .

Urfi Javed trolled again for her choice of clothes
Malaika Arora: अर्जुन-मलायका बोहल्यावर?, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण...

उर्फीचा हा लूक पाहून तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. एका यूजरने लिहिले - "कोणीतरी हिला भारतातून हाकलून द्यावे". दुसर्‍याने लिहिले -" मॅडमला सांगा,सर्व जग काही स्विमिंग पूल नाही, स्विमिंगचा ड्रेस घालून बाहेर पडली आहे''. एकाने लिहिले - "इतके कपडे घालूनही दीदी उदास का दिसत आहे" तर "तिचा स्कर्ट तर दिवाळीची चायना लाईट वाटते आहे", "उर्फीला या ड्रेसमध्ये मच्छर नाही चावणार? अशा भन्नाट कमेंट्स ऐकायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com