Urfi Javed: 'सेफ्टी पिन निघण्याचा अवकाश.... विषय संपला...!'|Urfi Javed Tv Actress share bold photoshoot video viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi javed

Urfi Javed: 'सेफ्टी पिन निघण्याचा अवकाश.... विषय संपला...!'

Urfi Javed Latest Look Video- उर्फी ही नेहमीच तिच्या हटके स्टाईलमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी उर्फीच्या तऱ्हेवाईक फॅशनमुळे तिला नेटकऱ्यांच्या (tv entertainment news viral) ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. मात्र ट्रोलिंगला घाबरली तर ती उर्फी कसली, तिनं आपली अजब गजब ढंगातील फॅशन सुरु ठेवल्याचे दिसून आले आहे. आताही तिनं जो ड्रेस परिधान केला आहे. त्यामुळे (bollywood actress) तिला नेटकऱ्यांकडून एकापेक्षा एक अशा भन्नाट प्रतिक्रिया आल्या आहेत. उर्फीनं परिधान केलेला ड्रेस भलताच बोल्ड आहे. तिच्या चाहत्यांना अशा बोल्ड फोटोशुटची सवय असली तरी उर्फीचा वेगळा अंदाज त्यांना वेडं करुन गेला आहे. यासगळ्यात तिला मिळणाऱ्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उर्फीचं ड्रेसिंग हे कायम तिला लाईमलाईटमध्ये आणतं. यासगळ्यात उर्फी चर्चेत राहण्यासाठी काहीही करत असल्याचे दिसून आले आहे. चक्क फळभाज्यांची सजावट करुन तिनं फोटोशुट केलं आहे. त्यामुळे ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली होती. काच, ब्लेड, प्लॅस्टिकच्या वस्तुंचं ड्रेसिंग उर्फीनं केलं होतं. त्यावरुन तिच्या चाहत्यांनी तिचं तोंडभरुन कौतूकही केलं होतं. आता उर्फीचा एक वेगळा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तिनं केवळ एका सेफ्टी पीनच्या आधारावर ड्रेसची सजावट केली आहे. ते ड्रेसिंग पाहून नेटकऱ्यांनी तर डोक्याला हातच लावला आहे. हे असं कसं फॅशन म्हणून तिला भन्नाट प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा: Laal Singh Chaddha चे नाव का जोडले जातेय पाकिस्तानशी? समोर आली मोठी माहिती

उर्फीच्या वेगवेगळ्या प्रयोगांना आतापर्यत तिच्या चाहत्यांची पसंती मिळाली आहे. त्या व्हिडिओनं फॅशन दुनियेत मोठी खळबळ उडवून दिली आहे. उर्फी ही ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसते आहे. तिनं जो ड्रेस परिधान केला आहे त्याचा सगळा भार एका सेफ्टी पीन्सवर आहे. उर्फीच्या त्या बोल्ड फोटोशुटवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझर्सनं म्हटलं आहे की, केवळ सेफ्टी पीन्सचा आधार आहे. तो गेला की विषयचं संपला. उर्फीच्या त्या फोटोंना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा: Mukesh Khanna On LSC : 'हिंदू आता...' शक्तिमान पुन्हा बोलला!

उर्फीच्या धाडसाचे नेटकऱ्यांनी कौतूक केले आहे. नेहमीच आपल्या बोल्ड फोटोशुटनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीच्या त्या फोटोवर आतापर्यत मोठ्या संख्येनं प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यात नेटकऱ्यांनी उर्फीवर सडकून टीकाही केली आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीचा अशाच प्रकारे एक फोटो व्हायरल झाला होता. त्यावरुनही ती ट्रोल झाली होती.

Web Title: Urfi Javed Tv Actress Share Bold Photoshoot Video Viral Social Media Fans Funny Reaction

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..