Urfi Javed: 'विचार काय हाय तुमचा...' उर्फीनं व्हिडिओ शेअर करत दिलं व्हॅलेंटाईनचं भन्नाट गिफ्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi javed Video

Urfi Javed: 'विचार काय हाय तुमचा...' उर्फीनं व्हिडिओ शेअर करत दिलं व्हॅलेंटाईनचं भन्नाट गिफ्ट

आज सर्वांवर व्हॅलेंटाईन डे चा फिवर चढला आहे. सगळे कलाकार आपल्या प्रिय व्यक्तीसाठी पोस्ट करत आहेत. सोशल मिडियावर तर शुभेच्छांचा पुरचं आला आहे. मग आशातच फॅशन सेंशेशन उर्फी जावेदही कुठे मागे राहणार होती.

उर्फी केवळ तिच्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसताच व्हायरल होतात. आता व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी उर्फीने तिच्या चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ पोस्ट केला आहे.

तिने तिची रेड हॉट स्टाइल दाखवली आहे. लाल रंगाच्या टू पीस ड्रेसमध्ये उर्फी भलतीच बोल्ड दिसत आहे. उर्फीचा ड्रेसही यावेळी खूप वेगळा आहे. पूर्ण बलून स्लीव्हज असलेला या ड्रेसमध्ये उर्फीने तिची फिगर दाखवली आहे. उर्फीची ही शैली काही चाहत्यांना खूप आवडली तर काहींनी नेहमीसारख तिला झाडलं आहे.

उर्फीने तिच्या लुकला न्यूड मेकअपने पूर्ण केले आहे. उर्फीचा हा व्हॅलेंटाइन लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत उर्फीने लिहिलय, 'व्हिक्टोरियाच्या सिक्रेट मॉडेल झाल्यासारखं वाटतं आहे. कदाचित कधीही डिलिट करणार नाही. 'हॅप्पी व्हॅलेंटाईन डे' उर्फीच्या या व्हिडिओवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

उर्फी नेहमीच अतरंगी ड्रेस परिधान करून सर्वांचे लक्ष वेधत असते. उर्फी जावेद बर्‍याचदा असा पोशाख परिधान करते की ती बातमी बनते. उर्फीच्या फॅशन सेन्सचे अनेकांनी कौतुक केले आहे.  उर्फी जावेदने पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत अनेक गोष्टींनी बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.


टॅग्स :Bollywood Newsactress