Urfi Vs Chitra wagh : उर्फी ज्यांना भावी सासू म्हणतेय, त्या चित्रा वाघ यांचा मुलगा कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitra Wagh, Devendra Fadnavis and Aaditya Wagh

Urfi Vs Chitra wagh : उर्फी ज्यांना भावी सासू म्हणतेय, त्या चित्रा वाघ यांचा मुलगा कोण?

मुंबई - मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ आणि आपल्या अतरंगी स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. बिनधास्त असलेली उर्फी भाजप नेत्या चित्रा वाघ यांना सातत्याने डिवचत आहे. या वादाची सुरुवात चित्रा वाघ यांनी केली असली तर उर्फी हा वाद इन्जॉय करत असल्याचं चित्र आहे. त्यातच उर्फी सातत्याने चित्रा वाघ यांना सासू म्हणत आहे. (Urfi javed Vs Chitra wagh news in Marathi)

हेही वाचा: Mumbai : धीरूभाई अंबानी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी; आरोपीला पकडण्यासाठी पोलिस...

उर्फीने अनेक ट्विट केले आहेत. त्यात ती सातत्याने चित्रा वाघ यांना सासू म्हणत आहे. याबाबतचे अनेक ट्विट तिने केले. सुरुवातीला चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र सासू या शब्दावर चित्रा वाघ अद्याप काहीही बोलल्या नाहीत. एकंदरीतच वाघ यावर काहाही बोलत नसल्या तरी उर्फीने आपला हल्ला तीव्र केला आहेत.

चित्रा वाघ एकावेळी उर्फी जावेद आणि रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल करताना दिसल्या मात्र उर्फीने ज्या पद्धतीने चित्रा वाघ यांना उत्तर द्यायला सुरू केलं, त्यामुळे चित्रा वाघ बॅक फुटवर गेल्या की काय असा प्रश्न उपस्थित होतोय.

या ट्विटमध्ये उर्फी म्हणते, मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू

या ट्विटमध्ये उर्फी म्हणते मेरी अंडरवेअर में छेद है, चित्राताई ग्रेट है...

यात उर्फी म्हणते, उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी तु गं सास.

या ट्विटमध्ये उर्फी म्हणते, चित्रा ताई मेरी खास है, फ्युचर मे होने वाली सास है

दरम्यान उर्फी सातत्याने चित्रा वाघ यांना सासू म्हणत असली तरी चित्रा वाघ यांचा मुलगा कोण आणि काय करतो, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. याबाबत झी न्यूजने वृत्त दिलं असून चित्रा वाघ यांच्या मुलाचं नाव आदित्य वाघ आहे.

एकंदरीतच चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यातील वाद वैयक्तीक पातळीवर गेला आहे. वास्तविक चित्रा वाघ यांनी तक्रार दाखल करून उर्फीच्या वैयक्तीक आयुष्यावर आक्षेप घेतला आहे. त्यानंतर उर्फी देखील वैयक्तीक टीकेवर आली आहे. आता हा वाद आणखी किती दिवस चालणार हे पाहाव लागणार आहे.

हे ही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?