बिनसलेल्या नात्याची गोष्ट : अखेर उर्मिला कोठारेची आदिनाथसाठी खास पोस्ट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

urmila kothare shares story for adinath kothare on his birthday after divorce controversy

बिनसलेल्या नात्याची गोष्ट : अखेर उर्मिला कोठारेची आदिनाथसाठी खास पोस्ट..

आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) अन् उर्मिला कानेटकर-कोठारे(Urmila Kothare) या दोघांमध्ये काही तरी बिनसलंय याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उर्मिला 'कोठारे' कुटुंबातून बाहेर पडली आहे,म्हणजे ती आता आदिनाथसोबत राहत नाही अशीही बातमी सूत्रांकडून कळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार,उर्मिला 'कोठारे' कुटुंबाचं घर ज्या इमारतीत आहे त्याच इमारतीतील एका दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. आदिनाथ-उर्मिलाची चार वर्षांची मुलगी जीजा हिला सध्या तिचे आजी-आजोबा म्हणेज आदिनाथ-उर्मिलाचे आई-बाबा चौघे मिळून सांभाळत आहेत. परंतु हे सर्व खोटे असल्याचं नुकतंच आदिनाथने एका मुलाखतीत सांगितलं. आता उर्मिलाने याबाबत मौन सोडलं आहे.

हेही वाचा: Photo: अबब !.. सोनाली कुलकर्णीच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो व्हायरल..

एका मराठी वृत्तवाहिनीशी याबाबत बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला,'उर्मिला आणि माझ्यात सगळं छान सुरु आहे. आम्ही एकमेकांसोबत खूश आहोत. आमच्या नात्याबाबत सगळ्या चुकीच्या बातम्या पसरल्या आहेत. फक्त सध्या आम्ही शूटिंगमध्ये बिझी असल्यानं एकमेकांसोबत दिसत नाही एवढंच. उर्मिला आणि मी दोघंही या अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्यांना महत्त्व देत नाही.' परंतु उर्मिला मात्र याबाबत काहीच बोलायला तयार नव्हती. परंंतु आदिनाथच्या वाढदिवसानिमित्त तिने एक खास पोस्ट केली आहे.

आदिनाथ कोठारे याचा काल १३ मे रोजी वाढदिवस झाला. आदिनाथ सध्या मुंबईत नाही. त्यामुळे या वाढदिवसाला तो आणि उर्मिला एकत्र नसणार याचीही चर्चा होती. उर्मिला आदिनाथ बाबत काही पोस्ट करेल का याकडेही सर्वांचे लक्ष होते. पण तिने आदिनाथसाठी एक खास पोस्ट केली. यामध्ये तिने आदिनाथला शुभेच्छाही दिल्या आहेत. शिवाय त्यांच्या जुन्या पॅकाग्लायडींग सहलीचे फोटोही शेअर केले आहेत.

adinath kothare and urmila kothare

adinath kothare and urmila kothare

'आदिनाथ तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे दिवस माझ्या अजूनही स्मरणात आहेत. तू नेहमी अशीच उंच भरारी घ्यावीस आणि तू यापेक्षाही मोठी उंची गाठू शकतोस. माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा दोन्हीही तुझ्यासोबत कायम आहेत,' असे उर्मिलाने म्हंटले आहे. तिच्या या पोस्टनंतर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळेल असे दिसते आहे.

Web Title: Urmila Kothare Shares Story For Adinath Kothare On His Birthday After Divorce Controversy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top