Urvashi Rautela Trolled: "बाई जगू दे त्याला", उर्वशीच्या रुग्णालयातील फोटोंमुळे नेटकऱ्यांनी झाडलं.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela Trolled

Urvashi Rautela Trolled: "बाई जगू दे त्याला", उर्वशीच्या रुग्णालयातील फोटोंमुळे नेटकऱ्यांनी झाडलं..

Urvashi Rautela Trolled: भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा कार अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुंबईतल्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याच्या अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक स्टोरी पोस्ट केली. ज्यावरुन चर्चांना उधाण आलं.

हेही वाचा: Rishabh Pant : उर्वशी रिषभला भेटायला रुग्णालयात? 'त्या' फोटोने चर्चांना उधाण

क्रिकेटर ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातील वाद हा सगळ्यांनाच माहित आहे. उर्वशी नेहमी अशी काहीतरी पोस्ट करते ज्यांचा सबंध कळत नकळत ऋषभ याच्याशी जोडला जातो. ऋषभच्या अपघातानंतरही तिने पोस्ट केली आणि आता तर तिने रिषभवर उपचार सुरू असलेल्या कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयाच्या बाहेरचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा: Rishabh Pant car accident : 'वहिनी ऋषभला भेटायला निघाल्या की काय?' उर्वशी थेट विमानतळावर

Urvashi Rautela

Urvashi Rautela

त्यामुळे आता उर्वशी रिषभला भेटायला रुग्णालयात गेली की काय? अशा चर्चा सुरु होती. मात्र आता नेटकरी तिला ट्रोल करु लागले आहेत.आता हॉस्पिटलचा फोटो शेअर करून काय फायदा? तेही क्रिकेटपटू पंतला ज्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असं म्हणतं यूजर्स याला चिप प्रसिद्धी म्हणत आहेत.

तर काहींना उर्वशीच्या या कृतीचा संताप येत आहे. "ही आता करमणूक नाही हा मानसिक छळ आहे!", "उर्वशी त्याचा पाठलाग करत आहे की काय? " असं म्हणतं काही ऋषभच्या चाहत्यांनी तिला झाडलं आहे.