esakal | Video: 'मॅडम लायसन्स प्लीज', उर्वशीला पोलिस अडवतात तेव्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

acrtress urmila

Video: 'मॅडम लायसन्स प्लीज', उर्वशीला पोलिस अडवतात तेव्हा...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील सध्याची सर्वात चर्चेतील फॅशनेबल (fashionable) आणि स्टायलिश (staylish) अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाचे (urvashi rautela) नाव घ्यावे लागेल. ती मनोरंजनाच्या क्षेत्रात चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. ती वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचेही दिसून आले आहे. उर्वशीनं आपल्या ग्लॅमरस लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे ती सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचं फोटोशुट चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी असते. इंस्टावरही उर्वशीचा फॉलोअर्सही मोठा आहे. 39 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स तिला आहे. त्यामुळे तो वाढविण्यासाठी ती नेहमी प्रयत्नशील असते. (urvashi rautela ride scooty policeman and asked for a driving license watch full video yst88)

उर्वशी आता चर्चेत आली आहे ते तिच्या एका व्हिडिओमुळे. तिनं तो आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळते की, उर्वशी एक स्कुटर घेऊन बाहेर पडते. सलवार सुट आणि मोकळे केस सोडून ती मोठ्या आनंदात फिरायला बाहेर पडली आहे. तिचा तो लूक भलताच सुंदर दिसतो आहे. दरम्यान एका पोलिसानं तिची गाडी थांबवली. आणि तिच्याकडे लायसन्सची मागणी केली. तेव्हा उर्वशी घाबरल्याचे दिसुन आली आहे. तेव्हा तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत.

हेही वाचा: जवळचे पैसे संपले, अभिनेत्री सविता बजाज आयसीयुमध्ये

हेही वाचा: नवरोबांच्या 'उद्योगामुळे' रडकुंडीला आलेल्या अभिनेत्री...

त्यावेळी उर्वशीनं महत्वाची कागदपत्रं दाखवून त्या पोलिसापासून आपला पिच्छा सोडवून घेतला. अर्थात हा व्हिडिओ रियल नसून तो रिलमधला आहे. उर्वशीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती शेवटी मोहम्मद रमादान बरोबर वर्साचे बेबी या म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. ती इन्स्पेक्टर अविनाशमध्ये रणदीप हुडामध्येही दिसणार आहे. याशिवाय लवकरच ती आपला तमिळ डेब्युही करणार आहे. ही एक बिग बजेट फिल्म असणार आहे.

loading image