'मी तोंड उघडलं तर तुझी प्रतिष्ठा...', उर्वशी रौतेलाच्या पोस्टनं उडाली खळबळ Urvashi Rautela | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

urvashi rautela shares post again targeting rishabh pant,what she said...

'मी तोंड उघडलं तर तुझी प्रतिष्ठा...', उर्वशी रौतेलाच्या पोस्टनं उडाली खळबळ

Urvashi Rautela-Rishabh Pant Controversy: उर्वशी रौतेला गेल्या काही दिवसांपासून भलतीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिच्यात आणि क्रिकेटर ऋषभ पंत मध्ये सोशल मीडियावर चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोघांनीही एकमेकांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. अर्थात,दोघांनीही नंतर पोस्ट डिलिट केल्या होत्या. पण दोघांमधील वाद मात्र काही त्यानं लपला नाही. आता पुन्हा उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे,ज्याचं कॅप्शन पाहून तरी वाटतंय की तिनं या पोस्टमधून पुन्हा ऋषभ पंतवर निशाणा साधला आहे.(urvashi rautela shares post again targeting rishabh pant,what she said...)

हेही वाचा: 'Jai Bhim' पुन्हा कायद्याच्या कचाट्यात, आता साऊथ स्टार सूर्याच्या विरोधात FIR

आपल्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर उर्वशी रौतेलानं एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्वशी फोटोशूट करताना दिसत आहे. पण या व्हिडीओवर नाही तर लोकांच्या नजरा खिळल्या आहेत ते उर्वशीनं त्या व्हिडीओ पोस्टला दिलेल्या कॅप्शनवर. लोक आता त्यावरनं अंदाज लावत आहेत की उर्वशीनं ही पोस्ट ऋषभ पंतसाठी लिहिली आहे.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत क्रिकेटर ऋषभ पंतने आपल्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. ज्यामध्ये लिहिलं होतं की,''काही लोक मुलाखतीत फक्त स्वतःच्या मनःस्वी आनंदासाठी खोटं बोलतात, कारण त्यांना बातम्यांच्या हेडलाईन्समध्ये रहायचं असतं. लोक फक्त फेममध्ये राहण्यासाठी कुठल्या पातळीला जातात हे पाहून मला दुःख होते''. एवढंच नाही तर ऋषभ पंत पुढे म्हणाला होता की,''मला त्रास देणं सोडून दे, खोटं बोलण्याला देखील मर्यादा असते''. ऋषभ पंतच्या या पोस्टची इंटरनेटवर जोरदार चर्चा रंगली होती. आता उर्वशीनं केलेली पोस्ट ही ऋषभ पंतवर केलेला तिनं पलटवार आहे अशा बातम्या रंगू लागल्या आहेत.

Web Title: Urvashi Rautela Shares Post Again Targeting Rishabh Pantwhat She

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..