वाढदिवस उर्वशीचा पण चर्चा नासिमची.. व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली, 'इच्छा पुर्ण' व्हिडिओ व्हायरल Urvashi Rautel | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urvashi Rautela

Urvashi Rautel: वाढदिवस उर्वशीचा पण चर्चा नासिमची.. व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली, 'इच्छा पुर्ण' व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आज तर तिचा वाढदिवस आहे. त्यामुळं तिची चर्चा तर होणार आत काही शंका नाही. मात्र तिच्या वाढदिवसाच्या दिवशी पाकिस्तानी क्रिकेटर नासिमचीच चर्चा रंगली आहे.

खरंतर, आज तिच्या वाढदिवसानिमित्त उर्वशी रौतेलाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बंजी जम्पिंग करताना दिसत आहे. यासोबत तिने लिहिले की, 'माझ्या वाढदिवसाची इच्छा काय असावी? दुसऱ्या वाढदिवसापेक्षा चांगली भेटवस्तू असूच शकत नाही. आज, मी माझं जीवन आणि त्यासोबत आलेलं सर्व काही साजरे करत आहे. मी माझे कुटुंब, मित्र आणि माझ्या सर्व चाहत्यांची आभारी आहे.

मग काय उर्वशी रौतेलानं पोस्ट टाकली आणि त्याची चर्चा होणार नाही असं होऊचं शकत नाही. तिची पोस्ट पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी तिला पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहच्या नावानं चिडवण्यास सुरवात केली. काहींनी तिला ट्रोलही केलं.

एका यूजरनं लिहिलयं की, 'मी नसीम शाहच्या कमेंटची वाट पाहत आहे', तर दुसऱ्यानं लिहिलं, 'माझ्यावर विश्वास ठेव, नसीम शाहनं तिला खासगीत शुभेच्छा दिल्या असतील.' तर काहींनी लिहिलयं, 'नसीम शाहचा मूड आधीच खूप खराब आहे, तो आज इच्छा करणार नाहीत.' याशिवाय काही यूजर्स ऋषभ पंतच्या कमेंटचीही वाट पाहत आहेत.

उर्वशी रौतेलाच्या एका कमेंटमुळं या सर्व चर्चांना उधाण आलं होतं. काही वेळापूर्वी नसीम शाहला उर्वशीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावर क्रिकेटरनंही तिला प्रतिक्रिया दिली होती. त्याचवेळी नसीम व्यतिरिक्त उर्वशीचे नाव ऋषभ पंतसोबतही जोडले गेले.