Urvashi Rautela Video: बाथरुम शॉवर व्हिडिओ लिक, नेटकऱ्यांकडून कमेंटसचा पाऊस|Urvashi Rautela Shower Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Uravashi Rautela Video Viral

Urvashi Rautela Video: बाथरुम शॉवर व्हिडिओ लिक, नेटकऱ्यांकडून कमेंटसचा पाऊस

Urvashi Rautela Video: टीव्ही मनोरंजन क्षेत्रामध्ये आपल्या अभिनयानं आणि बोल्डनेसनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री म्हणून उर्वशीची (Urvashi Rautela) वेगळी ओळख आहे. सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेत असते. त्याचे कारण तिचा हॉटनेस (Entertainment News) आता तिचा बाथरुममधील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्य़ांच्या भन्नाट कमेंटस मिळाल्या आहे. सोशल मीडियावर मोठा फॅन फॉ़लोअर्स (Social media viral video) असणाऱ्या उर्वशीनं यापूर्वी देखील वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ती आगामी काळात बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यापूर्वी तिच्या बोल्डनेसनं चाहत्यांना खूश केले आहे. (Urvashi Rautela Video)

त्या व्हिडिओमध्ये उर्वशी ही बाथरुममध्ये शॉवर घेताना दिसत आहे. तिचा तो अंदाज चाहत्यांना भलताच भावला आहे. हा व्हिडिओ उर्वशीच्या सनम रे या चित्रपटातील असून तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. त्यावर भन्नाट कमेंटस केल्या आहेत. एकानं उर्वशीनं तर कमाल केली आहे. तिच्या बोल्डनेस आणि हॉटनेसचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असं म्हटलं आहे. दुसऱ्यानं उर्वशी नेहमीच तिच्या बोल्डनेसनं चाहत्यांची झोप उडवते. तिच्या अदाकारीचं कौतुक. अल्पावधीतच उर्वशीनं मोठी लोकप्रियता मिळवली आहे. हरिव्दारमध्ये राहणाऱ्या उर्वशीनं 2009 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी मिस टीन इंडियाचा खिताब प्राप्त केला होता. त्यानंतर तिनं मिस इंडिया प्रिंसेस, मिस इंडिया सुपरमॉडल सारखे खिताबही आपल्या नावावर केले आहेत.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

सिंग साहब द ग्रेट नावाच्या चित्रपटापासून तिनं आपल्या फिल्म करिअरला सुरुवात केली होती. तिच्या त्या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. यानंतर तिनं काही म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले होते. त्याचा टीआरपी मोठा होता. लव डोस, लाल दुप्पटा, बिजली की तार, एक लडकी भीगी भागी सी, डुब गए आणि वो चांद कहा से लाओगी सारख्या म्युझिक व्हिडिओंचा समावेश आहे.

Web Title: Urvashi Rautela Shower Video Viral Social Media Fans Bold Comment

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top