Essential Voices: स्पेनमध्ये मराठमोळ्या उषा जाधवचा डंका

देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.
Usha jadhav
Usha jadhav

Bollywood News: सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार (National Awards) जिंकल्यानंतर उषा जाधवनं (Actress Usha Jadhav) देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. तिनं सातासमुद्रापार आपल्या नावाची ओळख प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे आता तिच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा (News On Social Media) सुरु झाली आहे. युरोपीय सिनेमामध्ये (Europian Cinema) उषा जाधवनं प्रभावी काम केलं आहे. तिच्या अभिनयानं तिला लोकप्रियता मिळवून दिली आहे. ती वेगवेगळ्या प्रकारे क्रिएटिव्ह काम करुन चाहत्यांची पसंती मिळवताना दिसत आहे. आता तिच्या नावाचा पुन्हा एकदा डंका वाजला असून तिनं स्पेन टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रामध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. (Television And movies news)

उषानं जगातील ज्या प्रभावी अभिनेत्री आहे त्यांच्या विशेष चर्चा सत्रामध्ये (Movies) भाग घेतल्याचे दिसून आले आहे. त्याची सध्या चर्चा आहे. त्या चर्चासत्रामध्ये तिला मान्यवर अतिथी म्हणून निमंत्रित कऱण्यात आले होते. तिनं एसिंशियल व्हॉयसेस या कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिनं केवळ भारताचे नाही तर आशिया खंडाचं प्रतिनिधीत्व केल्याचे दिसून आले आहे. या कार्यक्रमामध्ये आफ्रिका, युरोप, अमेरिका, लॅटिन अमेरिकेतील कलाकारांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या घडीला माध्यम आणि तंत्रज्ञान यांच्यात कशाप्रकारे बदल होतो आहे. त्यामध्ये आणखी काय उपाययोजना कराव्या लागतील, आपल्याला काय अभ्यास करावा लागेल, याची चर्चा करण्यात आली. दृक श्राव्य माध्यमांच्या विविध पैलूंवर यावेळी मंथन करण्यात आले. स्पेन आणि खेळ, साहित्य, संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्यानं स्पॅनिश असोशिएशन ऑफ व्हिमन इन फिल्म्स अँड टीव्ही चाही पुढाकार आहे.

Usha jadhav
Lata Mangeshkar: सांगलीकरांचा अभिमान लता!

याबाबत अभिनेत्रीनं एका वेबपोर्टलशी बोलताना उषा जाधव यांनी सांगितलं की, कोरोनाच्या काळात मला हे खासं काम करण्याची संधी मिळाली आणि मी त्या संधीचा लाभ घेतला. मानवतेची भाषा याला कुठल्याही प्रकारची बंधनं नाहीत. ती समजून घ्यायला अडथळा येत नाही. मला ते त्या चर्चा सत्राच्या वेळी जाणवलं. भारतामध्ये बोली भाषांची भिंत ही चित्रपट माध्यमानं तोडली. आणि आपल्याला त्या भिंतीच्या पल्याड पाहायला शिकवलं. आता मला लवकर भारतात परत यायचं आहे. मला इकडचा प्रोजेक्ट काम पूर्ण झाल्यावर माझ्या देशात जायचं असल्याचं उषानं सांगितलं.

Usha jadhav
Upcoming Marathi Movie : 'दिशाभूल' करण्यासाठी अभिनय बेर्डे सज्ज ; पाहा व्हिडीओ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com