esakal | वैभव तत्ववादीचा 'ग्रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

Vaibhav Tatwawadi

Vaibhav Tatwawadi |वैभव तत्ववादीचा 'ग्रे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी Vaibhav Tatwawadi लवकरच 'ग्रे' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक रहस्यमय थरारक चित्रपट असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' चित्रपटात वैभव हा 'सिद्धांत' नामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. ग्रे ही सिद्धांतच्या कुटुंबाची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादीसोबत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार भूमिका साकारणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित 'ग्रे' हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला झी5 प्रीमियरवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा: लग्नानंतर नऊ महिन्यांत मानसी नाईकने दिली 'गुड न्यूज'

वैभव तत्त्ववादी हा मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकार असून तो बॉलिवूडमध्येही ओळखीचा चेहरा आहे. ओटीटीमध्येही प्रवेश केलेला वैभव काही दिवसांपूर्वी सोनी लिव्हच्या 'प्रोजेक्ट ९१९१'मध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या रूपात दिसला होता.

loading image
go to top