
Valentine Day 2023: 'माझं पहिलं Valentine gift', प्रेमाच्या आठवणीत रमली हेमांगी!
मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी.अनेक मालिका, चित्रपट, नाटकात तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अभिनयासोबतच निरनिराळ्या कारणाने ती चर्चेत असते. ती सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. ती नेहमी आपले रील,व्हिडीओ,फोटो शेअर करताना दिसते.
नुकतंच तिने व्हॅलेन्टाईन डे निमित्त तिने नवऱ्यासाठी आणि तिच्या खास पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या नवऱ्यासोबतचा आणि हातातल्या रिंगचा फोटो शेअर करत लिहिलयं की, 'हे माझं पहीलं Valentine gift. १४ फेब्रुवारी २००७! मुलुंडच्या Pizza Hut मध्ये साजरा केला होता पहीला वहीला valentine day. आयुष्यात पहील्यांदा Pizza खाल्ला होता… नाही…त्याने खाऊ घातला होता. हीच माझी त्यादिवशीची propose ring होती आणि पुढे जाऊन हीच माझी engagement ring ही झाली.'
'खरंतर Propose तर करून झालं होतं. मी हो ही म्हणून झालं होतं. पण लग्नाच्या आधी साखरपुडा करायचाच असतो म्हणून लग्नाच्या काही तासांपुर्वी साखरपुड्याचे कपडे घालून एकमेकांना अंगठी घालण्याची विधीपुर्वक औपचारिक्ता पार पाडली. पण साखरपुड्याची अंगठी म्हणून मी हीच घालणार हे आधीच सांगितलं होतं. कशाला हवी उगाच दुसरी अंगठी! (अशी समजूतदार बायको मिळायला भाग्यच लागतं हो )'
'तेव्हा बोटात असलेली तीच अंगठी काढून एका नव्या feeling सह माझ्या होणाऱ्या नवऱ्याने पुन्हा माझ्या बोटात घातली. मी त्याला त्याच्यासाठी बनवलेली अंगठी घातली आणि झाला आमचा साखरपुडा!'
'तेव्हापासून आजतागायत ही माझ्या बोटात आहे.आम्ही एकमेकांना उगाचच काहीही gift करत नाही कामाच्याच गोष्टी gift करतो. दिवस ही साजरा होतो. गरज ही भागते आणि आठवण ही राहते.आजही आम्ही असच काहीतरी खरेदी करणार आहोत. तुम्हीही करा! Happy Valentine's Day from us to you! प्रेम दिनाच्या सर्वांना प्रेममय शुभेच्छा!'
हेंमागीने बऱ्याचदा तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहे. मात्र त्याच्या बद्दल फार कमी लोकांनाच माहित आहे. तिच्या नवऱ्यांच नाव संदिप धुमाळ असून तो एक सिनेमॅटोग्राफर आहे. त्या दोघांची लव्ह मॅरिज झालं. चित्रपटाच्या सेटवर ओळख झाली मग प्रेमात पडले त्यानंतर दोघांनी लग्न केले.