उमेशचा एक फोनकॉल अन् ढसाढसा रडू लागली होती प्रिया..', 'बापट-कामत' प्रेमाची बातच काही औरUmesh Kamat & Priya Bapat Love Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Valentine Day 2023: Umesh Kamat & Priya Bapat Love Story

Valentine Day 2023:'उमेशचा एक फोनकॉल अन् ढसाढसा रडू लागली होती प्रिया..', 'बापट-कामत' प्रेमाची बातच काही और

Valentine Day 2023: उमेश कामत आणि प्रिया बापट हे 'कपल गोल' देणारं जोडपं आहे. त्यांच्या लग्नाला जवळपास आता १३ वर्ष झाली असतील पण आजही दोघांमधलं बॉन्डिंग..प्रेम पाहिलं की मनोरंजन सृष्टीत आजच्या कलयुगातही अशी जोडपी आहेत हे पाहिलं की छान वाटतं.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांची लग्नापूर्वीची लव्ह स्टोरी आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. पण आज इथे मी सांगणार आहे तो किस्सा त्यांच्या लग्नानंतरचा आहे. तो वाचला की कदाचित आपल्यापैकी बरेच जणं म्हणाल लग्नापूर्वी हे असं घडतं ..एकमेकांप्रती कमालीचं प्रेम असंतच पण लग्नानंतरही ही इतकी ओढ अभावानंच बरं का..

पण कदाचित हे असे किस्से आपल्याला आपलं नातं अधिक मजबूत करायला मदत करून जातात हे नक्की. चला जाणून घेऊया प्रिया बापट- उमेश कामत यांच्यातील तो प्रेमाचा किस्सा..:(Umesh Kamat & Priya Bapat Love Story)

हा किस्सा आहे साधारण २०१३ सालातला...उमेश कामत आणि प्रिया बापट यांच्या लग्नाला दोन एक वर्ष झाली होती. आणि लग्नानंतर पहिल्यांदाच ते पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार होते. सिनेमा होता 'टाईमप्लीज..लग्नानंतरची लव्हस्टोरी'.

या सिनेमात उमेश कामत,प्रिया बापट यांच्यासोबत सई ताम्हणकर,सिद्धार्थ जाधवही महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिनेमात लग्ननांतरची लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. तेव्हा सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती. सिनेमाचं प्रमोशनही चांगलं झालं होतं. त्या प्रमोशन दरंम्यानचा किस्सा आता आम्ही सांगत आहोत.

'टाईमप्लीज..' सिनेमाच्या प्रमोशनल मुलाखती निमित्तानं प्रिया बापट,उमेश कामत,सई ताम्हणकर,सिद्धार्थ जाधव ही टीम साम मराठीच्या बेलापूर कार्यालयात पोहोचणार होते. सकाळी नऊ वाजता ठरल्याप्रमाणे कलाकार पोहोचले पण उमेश मात्र गैरहजर होता. विचारताच सांगण्यात आलं बरं नसल्यामुळे उमेश गैरहजर राहिला आहे.

मुलाखत सुरू होईपर्यंत अनेकदा प्रियाचे उमेशला फोनकॉल गेले असतील. इतक्यात मुलाखतीच्या काही सेकंद आधी प्रियाला काय झालं कुणास ठाऊक तिनं एक मिनिट.,म्हणत पुन्हा उमेशला फोन लावला..इतक्या समोरुन तो म्हणाला,''ताप वाढलाय थोडा..''

आणि मग जे घडलं त्यानंतर प्रियाला समजावून मुलाखत सुरू होईस तोवर अर्धा-पाऊणतास निघून गेला. कारण ताप वाढलाय थोडा हे उमेश सहज बोलून गेला पण उमेश प्रती कमालीची हळवी असलेल्या प्रियानं मुलाखत थांबवूया..नंतर करूया..मी पुन्हा येईन हे आश्वास देऊन धावत-पळत घर गाठायचा विचार फायनल केलं..आणि हा संपूर्ण वेळ ती ढसाढसा रडत होती. आता मुलाखत कसंबसं तिला समजावत पूर्ण केली त्याला वेगळेच कष्ट घ्यावे लागले.

पण त्यावेळी उमेश प्रती असलेल्या प्रियाच्या प्रेमाची एक छोटीशी झलक जवळून सर्वानां पहायला मिळाली. बाकी मुलाखतीचा खोळंबा होतोय हा विचार सोडला तर उमेश प्रती प्रियाचं असलेलं प्रेम पाहून सेटवरचा प्रत्येक जण बोलत होता...''टाइमप्लीज..हीच खरी लग्नानंतरची लव्हस्टोरी...''