वनिताच्या हॉट फोटोशुटनं खळबळ, 'बॉडी पॉझिव्हिटीचा' दिला संदेश 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 January 2021

अंगप्रदर्शन करुन प्रस्थापित संस्कृतीरक्षकांना खडे बोल सुनावणा-यांची संख्या मोठी आहे. यात अनेक सेलिब्रेटींचा सहभाग आहे. जगातील महासत्ता म्हणून गणल्या जाणा-या कित्येक देशांमध्ये अद्याप स्त्री आणि तिची वेशभुषा यावरुन सतत चर्चा होत असते. आता यासगळ्यावर सणसणीत उत्तर अभिनेत्री वनिता खरात हिनं दिलं आहे. तिचं हॉट फोटोशुट कमालीचं व्हायरल झालं आहे.

मुंबई - अंगप्रदर्शन करुन प्रस्थापित संस्कृतीरक्षकांना खडे बोल सुनावणा-यांची संख्या मोठी आहे. यात अनेक सेलिब्रेटींचा सहभाग आहे. जगातील महासत्ता म्हणून गणल्या जाणा-या कित्येक देशांमध्ये अद्याप स्त्री आणि तिची वेशभुषा यावरुन सतत चर्चा होत असते. आता यासगळ्यावर सणसणीत उत्तर अभिनेत्री वनिता खरात हिनं दिलं आहे. तिचं हॉट फोटोशुट कमालीचं व्हायरल झालं आहे. 

तुम्हाला शाहिद कपूरचा कबीर सिंग हा चित्रपट आठवतोय त्यात कबीरच्या घरात मोलकरणीचं काम करणारी भूमिका वनितानं साकारली होती. तिनं नुकतेच एका कॅलेंडरसाठी हॉट फोटोशुट केलं आहे. ते फोटोशुट अनेक गोष्टींना तोंड फोडणारे आहे. जे कोणी महिलांना त्यांच्या कपड्यांमुळे वेगवेगळी लेबल्स लावत असतील त्यांना वनितानं चांगलचं सुनावले आहे. मुळची मुंबईतील वरळी येथे राहणा-या वनितानं आपल्या अशाप्रकारच्या फोटोशुट मधून  'बॉडी पॉझिव्हिटीचा' संदेश दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वनितानं सोशल मीडियावर ते हॉट फोटो शेयर केले आहेत. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे. तर काहींनी तिच्या अशाप्रकारच्या नव्या भूमिकेचे कौतूकही केले आहे. इंस्टावरील त्या हॉट फोटोशुटमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपण जसे आहोत तसे आहोत. जे शरीर आपल्याकडे आहे त्याविषयी आपल्याला अभिमान असायला हवा. त्याबाबत कुणाची भीती बाळगण्याची काहीच कारण नाही. जे कुणी इतरांच्या दबावाला बळी पडत असतील त्यांनी तसे करु नये. असे वनितानं म्हटलं आहे. 

जान्हवी कपूरने वयाच्या २३ व्या वर्षी मुंबईत खरेदी केलं एवढ्या कोटींच घर

मला माझ्या टँलेटवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे विनाकारण मी कुणाला घाबरत नाही. माझ्यात आत्मविश्वास आहे. मी जशी आहे तशी आहे. आणि सगळ्यात मला माझ्या शरीराचा अभिमान आहे. वनितानं सोशल मीडियावर आपल्या अशाप्रकारच्या फोटोशुटसाठी खास हॅशटॅगही वापरला आहे. #BodyPositivity च्या माध्यमातून एक नवा विचार घेऊन ती चाहत्यांसमोर आली आहे. अर्थात तिच्या या फोटोशुटला अनेकांनी नावे ठेवली आहेत. काहींनी तिच्या नव्या विचाराचं कौतूकही केलं आहे. एवढचं नव्हे तर अनेक कलाकारांनी तिला पाठींबाही दर्शवला आहे.

सोनु सूदच्या आगामी सिनेमाची घोषणा, अमिताभ यांनीही दिल्या शुभेच्छा

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vanita Kharat bold photo shoot calendar post received thousands like