थलापती विजयचा 'वारिसू' VS किंग खानचा 'पठाण'! कोण जिंकणार? ट्रेलर पाहून उडेल झोप| Varisu Trailer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Varisu Trailer

Varisu Trailer : थलापती विजयचा 'वारिसू' VS किंग खानचा 'पठाण'! कोण जिंकणार? ट्रेलर पाहून उडेल झोप

Varisu Trailer Twitter Reaction: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा पठाणच्या रिलिजची तारीख जवळ येत चालली आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चाहते लाडक्या शाहरुखच्या चित्रपटाची आतूरतेनं वाट पाहत होते. मात्र यात आता पठाणसाठी धक्कादायक बातमी आहे.

बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद हा गेल्या वर्षांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. पुष्पापासून सुरु झालेला हा वाद कमल हासन आणि रिषभ शेट्टीच्या कांतारापर्यत सुरु राहिला. त्यामध्ये बॉलीवूडच्या चित्रपटांना टॉलीवूडच्या चित्रपटांनी दणका दिल्याचे दिसून आले होते. आताही टॉलीवूडच्या एका चित्रपटानं शाहरुखची झोप उडवल्याचे दिसून आले आहे.

Also Read - ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

विजय थलापती हे साऊथ चित्रपट विश्वातील मोठं नाव. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा असल्याचे दिसून आले आहे. त्याच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या मास्टर आणि द बीस्टला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. प्रेक्षकांनी त्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. आताही विजय हा त्याच्या वारिसूमुळे चर्चेत आला आहे. त्याचा ट्रेलर व्हायरल झाला आहे.

वारिसूचा ट्रेलर व्हायरल झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्याला मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. तो ट्रेलर पाहून अनेकांनी शाहरुखसाठी मोठा इशारा असल्याचे म्हटले आहे. विजयपेक्षा शाहरुखचा फॅन क्लब मोठा असल्यानं त्याला फारसा धक्का बसणार नाही असे जरी म्हटले जात असले तरी वारिसू ब्लॅक हॉर्स ठरु शकतो अशीही भीती चाहत्यांना आहे. त्याचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

थलापती विजय सोबत रश्मिका मंदानाही दिसणार आहे. तिच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पुष्पामधील अभिनयाचे वारेमाप कौतूक झाले होते. ती आता विजयसोबत वारिसूमध्ये दिसणार आहे. विजय आणि रश्मिकाच्या ट्रेलरमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे. विजयचा वारिसू हा १२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा: Pathaan Trailer Release Date : 'आता देवालाच माझी काळजी!' शाहरुखच्या पठाणच्या ट्रेलरची तारीख ठरली

किंग खानचा पठाण हा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार असून अजुन त्याचा ट्रेलर काही प्रदर्शित झालेला नाही. तो १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र गेल्या वर्षी देखील बॉलीवूडच्या बिग बजेट चित्रपटांच्या वेळी टॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले होते. विजयच्या चित्रपटामध्ये रश्मिका मंदाना, प्रकाश राज, सरथ कुमार, संगीता यांच्या प्रमुख भूमिका आहे. तर शाहरुखच्या पठाणमध्ये दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम यांच्या भूमिका आहेत.