esakal | अभिनय नव्हे तर या क्षेत्रात वरुणला करायचं होतं करिअर

बोलून बातमी शोधा

varun dhawan
अभिनय नव्हे तर या क्षेत्रात वरुणला करायचं होतं करिअर
sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे वरूण धवन. करण जोहरच्या 'स्टूडेंट ऑफ द ईयर' या चित्रपटामधून त्याने अभिनय क्षेत्रात पदर्पण केले. आज वरूणच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दल काही खास गोष्टी.

नुकतंच वरूणने नताशा दलाल या त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केलं. करिना कपूरच्या चॅट शोमध्ये वरुणने सांगितले की, वरूण नताशाला सहावीत असल्यापासून ओळखतो. शाळेत असल्यापासूनच त्या दोघांमध्ये मैत्री होती. 12 वी पर्यंत त्या दोघांची मैत्री घट्ट झाली. जेव्हा वरूणने नताशाला पहिल्यांदा प्रपोज केले तेव्हा नताशाने त्याला नकार दिला होता. पण त्यानंतर काही दिवसांनी नताशाने होकार दिला.

वरूणचे वडील 90 च्या दशकातले प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डेव्हिड धवन हे आहेत. त्यामुळे त्याला चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा निर्माण झाली. पण एका मुलाखतीत वरूणने सांगितले होते की अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी त्याल रेसलर होण्याची इच्छा होती. पण आचानक त्याला चित्रपट क्षेत्राबद्दल आकर्षण वाटू लागले. वरूणनेने नॉटिंघम ट्रेंट यूनिवर्सिटीमधून बिजनेस मैनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. सुरूवातीला वरूणने 'माय नेम इज खान’ या चित्रपटामध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. 2012 मध्ये करण जोहरने वरूणला ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका करण्याची संधी दिली.

हेही वाचा : बिल थकल्याने श्रवण यांचे पार्थिव देण्यास रुग्णालयाचा नकार? जाणून घ्या सत्य

वरूणच्या अभिनयाने बॉलिवूडमधील सर्व चित्रपट दिग्दर्शकांचे मन जिंकले. 'मैं तेरा हिरो', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनियाँ', 'बद्रीनाथ की दुल्हनियाँ', 'दिलवाले', 'बदलापूर', 'एबीसीडी 2', 'ढिशूम', 'जुड़वा 2', 'अक्टूबर', 'स्ट्रीट डांसर 3 डी', 'कलंक' आणि 'कुली नं 1' या हिट चित्रपटांमध्ये वरूणने प्रमुख भूमिका केली आहे.लवकरच वरूणचा ‘भेडिया’ हा चित्रपच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात वरूणसोबत प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनॉन प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे.