वरूण भेटीस आली अन पोलिसांना सापडली!

टीम ई सकाळ
सोमवार, 12 जून 2017

बाॅलिवूडचा मोठा प्रभाव भारतीय जनमानसावर आहे. म्हणूनच या कलाकारांना भेटण्यासाठी किंवा त्यांची एक झलक मिळावी म्हणून देशाच्या कानाकोपर्यातून त्यांच चाहते येत असतात. असाच एक प्रकार घडला वरुण धवनच्या बाबतीत. कारण् त्याला भेटायला चक्क रायपूरहून एक व्यक्ती आली होती. याची वरूणला कल्पनाही नव्हती. पण कांजूरमार्ग पोलिसांकडून जेव्हा त्याला ही बाब कळली त्यावेळी मात्र तो हबकला. 

मुंबई : बाॅलिवूडचा मोठा प्रभाव भारतीय जनमानसावर आहे. म्हणूनच या कलाकारांना भेटण्यासाठी किंवा त्यांची एक झलक मिळावी म्हणून देशाच्या कानाकोपर्यातून त्यांच चाहते येत असतात. असाच एक प्रकार घडला वरुण धवनच्या बाबतीत. कारण् त्याला भेटायला चक्क रायपूरहून एक व्यक्ती आली होती. याची वरूणला कल्पनाही नव्हती. पण कांजूरमार्ग पोलिसांकडून जेव्हा त्याला ही बाब कळली त्यावेळी मात्र तो हबकला. 

वरूण धवनचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याला त्याची प्रचिती वारंवार येत असते. मात्र आदिती सुरानाने मात्र त्यावर कडी केली. केवळ वरूणला भेटण्यासाठी ती रायपूरहून मुंबईत पळून आली. घरच्यांना तिच्या जाण्याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी रायपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर कांजूरमार्ग पोलिसांनी तिला स्टेशनरून अटक केली. तिची चौकशी केल्यानंतर तिने घरून पळून येण्याचे कारण विचारले. तर तिने वरूणला भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. पोलिसांनी वरूणशी संपर्क साधला. त्याला या मुलीची कल्पना दिल्यानंतर वरूणने तत्काळ तिची भेट घेतली. आणि हे वर्तन अत्यंत चुकीचे असल्याचे सांगितले. दोन तास तिची समजूत काढल्यावर आणि तिच्यासोबत सेल्फी काढल्यानंतर आदितीचे मतपरिवर्तन झाले. आणि पोलिसांनी तिला तिच्या घरी पाठवून दिले. 

Web Title: Varun dhawan fan esakal news

टॅग्स