'वरुण धवन - नताशाच्या लग्नाची तारीख ठरली' ; काकानं तयारी सुरु केली

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 21 January 2021

आता ज्या चित्रपटांत माझ्यासाठी भूमिका होती त्यात मी काम केले. ज्यात नव्हते त्यात विनाकारण लुडबूड केली नाही.

मुंबई - वरुण धवन आणि नताशा दोघेही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या तारखेवरून गप्पा रंगण्यास सुरुवात झाली. आता लग्नाची तारीख ठरल्यानंतर त्या दोघांनाही चाहत्यांनी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. वरुण आणि नताशा दलाल दोघेही लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे.

वरुणनं घेतलेल्या लग्नाच्या निर्णयामुळे त्याचे वडिल डेव्हिड धवन आणि काका अनिल धवन यांना कमालीचा आनंद झाला आहे. काकांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, माझ्या पुतण्याचे लग्न येत्या 24 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे. आता त्याच्या लग्नाची तयारी सुरु केली आहे. नियोजन केले आहे. सगळीकडे धांदल सुरु झाली आहे, हाताशी वेळ कमी असल्याने घाईनं सा-या गोष्टी कराव्या लागणार आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

आतापर्यत डेव्हिड धवन यांनी तयार केलेल्या चित्रपटांमध्ये तुम्ही का दिसला नाहीत असा प्रश्न ज्यावेळी अनिल यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सांगितले की, मी त्यांच्याबरोबर हिरो नं 1, रास्कल्स आणि कुली नं 1 चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्याची फारशी कुणाला काही माहिती नाही. आता ज्या चित्रपटांत माझ्यासाठी भूमिका होती त्यात मी काम केले. ज्यात नव्हते त्यात विनाकारण लुडबूड केली नाही. मुळात म्हणजे माझ्या भावाला ज्याप्रकारे कॉमेडी चित्रपट करायला आवडतात तसे मला आवडत नाही हा मुद्दा आहे. ते मला सुट होत नाहीत. ज्यावेळी माझे करियर सर्वात टॉपला होते तेव्हा माझी इमेज ही एका शांत हिरोसारखी होती. त्यामुळे जेव्हा अॅक्शन चित्रपट करण्याची वेळ आली तेव्हा मात्र मी माघार घेतली. याचे कारण म्हणजे गुंडांना मारहाण करताना ते हास्यास्पद वाटले असते.

प्रतिक गांधी दिसणार मर्डर मिस्ट्री असलेल्या वेबसिरीजमध्ये

डेव्हिड धवन यांचे लहान भाऊ अनिल यांच्याविषयी फार कमी जणांना माहिती आहे. एकेकाळी त्यांनीही हिट चित्रपट दिले आहेत. 70 च्या दशकात त्यांनी पिया का घर, अन्नदाता, समझौता, चेतना, हवस सारखे हिट चित्रपट दिले आहेत. मात्र त्यानंतर त्यांच्या करिअरला ब्रेक लागला. तोपर्यत त्यांचे भाऊ बॉलीवूडमधील मोठे निर्माते आणि दिग्दर्शक झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varun Dhawan Natasha Dalal married on January 24 uncle Anil Dhawan confirms date