
हर्षद मेहताच्या आय़ुष्यावर आधारीत स्कॅम 1992 या वेबसिरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाल्या. स्कॅममुळे हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधी या अभिनेत्याचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं.
पुणे - हर्षद मेहताच्या आय़ुष्यावर आधारीत स्कॅम 1992 या वेबसिरीजला प्रचंड लोकप्रियता मिळाल्या. स्कॅममुळे हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतिक गांधी या अभिनेत्याचं प्रेक्षकांकडून कौतुक झालं. गेल्या 15 वर्षांपासून प्रतिक चित्रपटसृष्टीत ओळख मिळवण्यासाठी आणि कामासाठी धडपडत आहे. त्याला स्कॅम 1992 वेबसिरीजने नवी ओळख मिळवून दिली. या सिरीजनंतर त्याला इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक ऑफर्स आल्या आहेत.
स्कॅमनंतर प्रतिक गांधी हा नव्या वेबसिरीजमध्ये दिसू शकतो. दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया वेबसिरीज तयार करत असून ती सिक्स सस्पेक्ट या पुस्तकावर आधारीत असल्याचं म्हटलं जात आहे. विकास स्वरुप यांनी लिहिलेलं पुस्तक उत्तर प्रदेशातील गृहमत्र्यांच्या मुलाच्या मर्डर मिस्ट्रीवर आहे.
हे वाचा - 'चारचौघात सांगता येणार नाही असं साजिद माझ्याशी वागला'
तिग्मांशू यांनी याआधी पानसिंग तोमर, साहेब, बीवी और गँगस्टर या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गँग्स ऑफ वासेपूरमधील त्यांच्या कामाचेही सर्वांनी कौतुक केलं होतं. आता प्रतिक आणि तिग्मांशू या जोडगोळीला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील. याशिवाय त्यांच्यासोबत रिचा चढ्ढासुद्धा दिसणार आहे.
हे वाचा - लग्नाला यायचं हं! सायली संजीवचा 'बस्ता' लवकरच
स्कॅम 1992 मध्ये कशी मिळाली भूमिका
प्रतिक गांधी यांची स्कॅम 1992 च्या ऑडिशनमध्ये निवड कशी झाली याचा किस्साही रंजक आहे. ते ऑडिशन देण्यासाठी गेले होते तेव्हा निर्माते हंसल मेहता यांना माहितीच नव्हतं की प्रतिक ऑडिशनसाठी आले आहेत. जेव्हा प्रतिकबद्दल त्यांना समजलं तेव्हा तेच हर्षद मेहताची भूमिका करतील हे नक्की करण्यात आलं. कारण त्याआधी हंसल मेहता यांनी प्रतिक यांचे प्रादेशिक चित्रपट दो यार आणि राँग साइडसह थिएटरमधील काम पाहिलं होतं.