esakal | 'तुमचा गैरसमज तुमच्याकडेच ठेवा'; ट्रोलरला वरुण धवनचं सडेतोड उत्तर

बोलून बातमी शोधा

Varun Dhawan
'तुमचा गैरसमज तुमच्याकडेच ठेवा'; ट्रोलरला वरुण धवनचं सडेतोड उत्तर
sakal_logo
By
स्वाती वेमूल

नेहमीच आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता वरुण धवन याने सोशल मीडियावर एका ट्रोलरला सडेतोड उत्तर दिलं आहे. आगामी 'भेडिया' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वरुण अरुणाचल प्रदेशला पत्नी नताशा दलालसोबत शूटिंगसाठी गेला होता. तिथून परत मुंबईला येत असताना विमानतळावर पापाराझींनी त्याला व त्याच्या पत्नीला फोटोंसाठी घेरलं. सध्याच्या कोरोना काळाची परिस्थिती लक्षात घेता वरुणने संबंधित फोटोग्राफर्सना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन केलं. त्याचसोबत एका फोटोग्राफरला मास्क नीट तोंडावर लावण्यास सांगितलं. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला आणि काही नेटकऱ्यांनी वरुणच्या वागणुकीबाबत प्रश्न उपस्थित केले. काहींनी तर वरुण नताशासोबत फिरायला गेला असल्याचाही निष्कर्ष लावला. त्यावरून चिडलेल्या वरुणने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं.

'देशातील लोक कोरोनामुळे मरत असताना सेलिब्रिटी म्हणून तुला असलेले विशेषाधिकार गाजवू नकोस', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. त्यावर वरुणने उत्तर दिलं, 'बरं, तुमचा समज चुकीचा आहे. मी माझ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलो होतो, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी नाही. मीसुद्धा कोरोनामुळे माझ्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय. त्यामुळे तुम्ही तुमचे गैरसमज तुमच्याकडेच ठेवा.' वरुणने नुकताचा सोशल मीडियावर एका चाहत्याने तयार केलेला त्याचा पोस्टर शेअर केला होता. त्यावरूनही त्याला ट्रोल करण्यात आलं होतं. ट्रोलिंगमुळे नंतर वरुणने तो फोटो डिलिट केला.

हेही वाचा : अॅक्शनचा तडका, दमदार संवाद; 'राधे'चा ट्रेलर पाहिलात का?

img

वरुणच्या 'भेडिया' या चित्रपटाचं शूटिंग अरुणाचल प्रदेशमध्ये होत आहे. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात वरुणसोबतच क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत आहे. 'भेडिया'शिवाय वरुण 'जुग जुग जियो' या चित्रपटात भूमिका साकारणार आहेत. यामध्ये अनिल कपूर, नीतू कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या भूमिका आहेत.