वरुणची आवडती सेलेना 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

वरुण धवन "स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून पहिल्यांदा झळकला आणि त्याचं नाव आलिया भट्टबरोबर जोडलं गेलं. त्यानंतर आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं अफेअर असल्याच्या बातम्या यायला लागल्यानंतर आलियाचं नाव त्याच्या नावापासून वेगळं झालं. पण वरुण हा बॉलीवूडमधला तरुण सितारा कोणाला बरे डेट करत असेल? याची उत्सुकता त्याच्या तमाम फीमेल फॅन्सना असतेच. नुकतंच एका वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत वरुणला विचारलं गेलं, की जर तुला एका हॉलीवूड अभिनेत्रीला डेट करायचं असेल तर तू कोणाला डेट करशील? तर वरुणने सेलेना गोमेजला निवडलं. सेलेना गोमेज ही हॉलीवूडमधली गायिका आणि अभिनेत्री आहे.

वरुण धवन "स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून पहिल्यांदा झळकला आणि त्याचं नाव आलिया भट्टबरोबर जोडलं गेलं. त्यानंतर आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचं अफेअर असल्याच्या बातम्या यायला लागल्यानंतर आलियाचं नाव त्याच्या नावापासून वेगळं झालं. पण वरुण हा बॉलीवूडमधला तरुण सितारा कोणाला बरे डेट करत असेल? याची उत्सुकता त्याच्या तमाम फीमेल फॅन्सना असतेच. नुकतंच एका वाहिनीवर झालेल्या मुलाखतीत वरुणला विचारलं गेलं, की जर तुला एका हॉलीवूड अभिनेत्रीला डेट करायचं असेल तर तू कोणाला डेट करशील? तर वरुणने सेलेना गोमेजला निवडलं. सेलेना गोमेज ही हॉलीवूडमधली गायिका आणि अभिनेत्री आहे. तो म्हणाला, "ती थोडीशी भारतीय दिसते आणि खूप सुंदर आहे. मी लहान असाताना मला अँजेलिना जोली खूप आवडायची. पण आता ती मोठी झाली आहे आणि अर्थात मीही.' 

Web Title: varun wants selena gomez date