वसुंधरा चित्रपट महोत्सव 1 ते 4 ऑक्‍टोबर दरम्यान कोल्हापुरात

आेंकार धर्माधिकारी
सोमवार, 10 सप्टेंबर 2018

कोल्हापूर - पर्यावरण चळवळीला वाहिलेला नववा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 1 ते 4 ऑक्‍टोबर दरम्यान शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात लेखक, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या हस्ते होईल.

यंदा "प्रदूषण रोखा, नदी वाचवा' अशी या महोत्सवाची संकल्पना असून यासंदर्भातील विविध उपक्रमही महोत्सवा दरम्यान केले जाणार आहेत. अशी माहिती पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. 

सुरुवातीला किलोस्कर संस्थेचे वरिष्ठ व्यवस्थापक व्ही. एम. देशपांडे यांनी किलोस्कर संस्थेने कारखान्याच्या ठिकाणी उभारलेल्या पर्यावरणपुरक व्यवस्थांची माहिती दिली. महोत्सवाची माहिती देताना उदय गायकवाड म्हणाले, "नदी ही संकल्पना घेऊन महोत्सवाची रचना केली आहे. या निमित्ताने "रिव्हर अँड फन', "वस्त्रोद्योग व नदी प्रदूषण', "नदी प्रदूषण रोखण्याचे तंत्रज्ञान' या विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

महोत्सवात 35 पेक्षा अधिक चित्रपट दाखवण्यात येणार असून हेरीटेज वॉक, छायाचित्र प्रदर्शन, अभ्यास सहल हे उपक्रमही होणार आहेत. तसेच वसुंधरा सन्मान, वसुंधरा मित्र, वसुंधरा गौरव पुरस्काराही दिले जाणार आहेत. के. आय. टी  कॉलेज, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट, दळवीज आर्टस इन्स्टिट्यूट, डि. के. टी. ई कॉलेज इचलकरंजी, शिवाजी विद्यापीठ यांचाही सहभाग या महोत्सवात आहे.' 

या पत्रकार परिषदेला किलोस्कर संस्थेचे एच. आर. मॅनेजर राहूल पवार, निसर्ग मित्रचे अनिल चौगुले, चित्रकार विजय टिपुगडे,.केदार मुनिश्‍वर, ऐश्‍वर्या मुनिश्‍वर, भाऊ सूर्यवंशी हे उपस्थित होते. 

पर्यावरणपुरक महोत्सव 
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना प्लॅस्टिक, थर्माकॉल यांचा वापर कटाक्षाने टाळला आहे. दळवीज आर्टसच्या विद्यार्थ्यांनी कापड, कागद यांचा वापर करून माहिती फलक बनवले आहेत. चित्रे, छायाचित्रे यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक आहेत. पुरस्कारार्थिंना देण्यात येणारी स्मृतीचिन्हेही कार्डबोर्डची आहेत. असे उदय गायकवाड यांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vasundhara Film Festival in October