Vedaa Teaser : 'झगडना नही आता मुझे सिर्फ जंग लढनी आती है', जॉन अन् शर्वरीच्या 'वेदा'चा थरारक टीझर!

निखिल अडवाणी दिग्दर्शित वेदा (Vedaa TeaserViral) नावाच्या चित्रपटाचा टीझर आता व्हायरल झाला आहे.
Vedaa Movie Teaser News
Vedaa Movie Teaser News

Vedaa Teaser Out : बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहम अन् चर्चेतील अभिनेत्री शर्वरी वाघच्या बहुप्रतिक्षित अशा वेदाचा टीझर (Vedaa Teaser) प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या विषयांवरील या चित्रपटातील टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. बऱ्याच दिवसांपासून वेदाच्या टीझरची चाहते वाट पाहत होते.

जॉन (John Abraham) अन् शर्वरी (Sharvari Wagh) हे पहिल्यांदाच वेदाच्या माध्यमातून स्क्रिन शेयर करणार आहेत. यापूर्वी या चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यात शर्वरीचा हटके स्वॅग अन् अंदाज चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. बाटला हाऊस, कल हो ना हो आणि सला ए इश्क नावाच्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या निखिल अडवाणीनं (Nikkhil Advani) वेदाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो चार वर्षानंतर कमबॅक करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोन महिन्यांपूर्वी वेदा चित्रपटाची घोषणा करण्यात होती. दरम्यान त्याचा एक पोस्टरही रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून चाहत्यांच्या मनात (Vedaa Poster Viral) या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून आले होते. पोस्टरनंतर आता टीझरही प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. खासकरुन जॉन आणि शर्वरीचा अंदाज चित्रपटाविषयी खूप काही सांगून जाणारा आहे.

वेदाच्या टीझरची सुरुवात ही शर्वरीपासून होते. त्यात ती भ्रष्टाचारानं बरबटलेल्या व्यवस्थेच्या विरोधात दोन हात करताना दिसते. मात्र ही लढाई तिच्यासाठी सोपी नाही. यावेळी तिला खूप साऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते. अशात तिला साथ मिळते ती जॉन अब्राहमची. तो तिला सांगतो की, "मुझे झगड़ना नहीं आता, सिर्फ जंग लड़नी आती है।"

टीझरमध्ये जॉन अन् शर्वरीची अनोखी केमिस्ट्री दिसून येते, अॅक्शन, थ्रिलनं भरलेल्या या चित्रपटामध्ये दोन्ही कलाकारांनी केलेली भूमिका चाहत्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. एका दृष्यामध्ये सध्याची आघाडीची अभिनेत्री तमन्नाही दिसून येते.

कधी प्रदर्शित होणार?

निखिल अडवाणी दिग्दर्शित या चित्रपटाचा निर्मिती जॉन अब्राहमनं केली आहे. बंटी और बबली २ नंतर शर्वरी पुन्हा एका नव्या अंदाजातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट येत्या १२ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. जॉन अन् शर्वरीशिवाय या चित्रपटामध्ये अभिषेक बॅनर्जीचीही महत्वाची भूमिका आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com