Krishnam Raju Death: माजी केंद्रिय मंत्री कृष्णम यांच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीला धक्का; प्रभासलाही...

कृष्णम राजू हे बाहुबली फेम प्रभासचे काका होते
Krishnam Raju Death
Krishnam Raju Deathesakal

Krishnam Raju: साऊथ अभिनेता आणि पूर्व केंद्रिय मंत्री यू.व्ही. कृष्णम राजू यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी त्यांच्या प्रकृतीत बिघाड आल्याने पहाटे पावणे चारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कृष्ण राजू साऊथ सिनेमांमध्ये सक्रिय होते. त्यांनी टॉलीवुडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

कृष्णम यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कृष्णम राजू हे साऊथ सुपरस्टार प्रभासचे काका असून या दु:खद क्षणी प्रभास कृष्णम राजूंच्या कुटुंबाबरोबर खंबीरपणे उभा आहे. कृष्णम यांच्या जाण्याने साऊथच्या अनेक बड्या कलाकारांना दु:ख झाले असून अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे. केंद्रिय मंत्री अमित शहा यांनीही कृष्णम यांना ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

"कृष्णम यांच्या निधनाची बातमी ऐकून फार दु:ख होतंय. साऊथचे लोकप्रिय कलाकार आणि पूर्व केंद्रिय मंत्री कृष्णाम राजू आज आपल्यात नाही यांचं फार दु:ख होतंय. त्यांनी अभिनयातून लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत आणि समाजाच्या विकासासाठी मोलाचं कार्य केलं आहे. त्यांचं निधन हे तेलगु सिनेमासृष्टीसाठी दु:खद असल्याचं" त्यांनी ट्विट करत लिहिलंय.

साऊथचे डायरेक्टर मारुती यांनाही सोशल मीडियावर ट्विट करत कृष्णम यांना श्रद्धांजली दिली आहे. त्याच्या निधनाची बातमी सगळ्यांसाठी धक्कादायक आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशा शब्दांत त्यांनी ट्विट केले आहे.

कृष्ण यांच्या करियरबाबत बोलायचं झाल्यास चित्रपटांत पाऊल ठेवण्याआधी ते पत्रकार होते. १९९६ मध्ये त्यांनी चिलाका गोरनिका या चित्रपटांतून सिनेमासृष्टीतील करियरला सुरूवात केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटासाठी त्यांना नंदी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपटांत काम केलं. त्यांच्या फिल्मी करियरमध्ये त्यांनी एकूण १८३ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com