स्वदेसमधील कावेरीअम्मा काळाच्या पडद्याआड

वृत्तसंस्था
Wednesday, 19 February 2020

कोणत्याही चित्रपटात प्रेमळ आई किंवा आजी ही अभिनयामुळे लक्षात राहते. शाहरुख खानच्या स्वदेसमधली कावेरी अम्मा आठवतेय? कावेरी अम्मा अर्थातच ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं आहे.

कोणत्याही चित्रपटात प्रेमळ आई किंवा आजी ही अभिनयामुळे लक्षात राहते. शाहरुख खानच्या स्वदेसमधली कावेरी अम्मा आठवतेय? कावेरी अम्मा अर्थातच ज्येष्ठ अभिनेत्री किशोरी बलाल यांचं निधन झालं आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूडमध्येही त्यांनी आपली छाप उमटवली होती. स्वदेसचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्वदेसमधील कावेरीअम्मा या भूमिकेमुळे त्या बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाल्या होत्या. प्रेमळ, दयाळू, मनमिळावू अशा कावेरीअम्माला आशुतोष गोवारीकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हणले आहे की, 'किशोरी बलाल यांच्या निधनामुळे दुःख होत आहे. तुमच्या प्रेमळ, दयाळू स्वभावामुळे तुम्ही कायम लक्षात राहाल. स्वदेसमध्ये साकारलेली कावेरी अम्मा कायम आमच्या स्मरणात राहील. तुमची खूप आठवण येईल.' अशा शब्दात आशुतोष यांनी दुःख व्यक्त केले आहे. 

किशोरी बलाल यांनी मुख्यतः दाक्षिणात्य चित्रपटात काम केले. १९६०मध्ये त्यांनी अभिनयाला सुरवात केली. पण स्वदेसमधील कावेरी अम्माच सगळ्यात लोकप्रिय ठरली. याशिवाय अय्या, लफंगे परिंदे या चित्रपटांतही त्यांनी काम केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: veteran actress Kishori Ballal passed away