ज्येष्ठ दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन | Veteran director T Rama Rao passes away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

director T rama rao passes away

ज्येष्ठ दिग्दर्शक टी रामा राव यांचे निधन

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता तातिनेनी रामाराव (टी रामाराव) (T rama rao) यांनी 20 एप्रिल 2022 रोजी चेन्नई येथे अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते 83 वर्षांचे होते. रामा राव यांच्या कुटुंबीयांनी या निधनाबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (२० एप्रिल) संध्याकाळी चेन्नई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी तातिनेनी जयश्री आणि मुले चामुंडेश्वरी, नागा सुशीला, अजय आणि इतर कुटुंबीय आहेत.

हेही वाचा: 'तात्या विंचू', धनंजय मुंडेंचा 'मनसे' समाचार

त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. "कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे की, तातिनेनी रामा राव यांना २० एप्रिल २०२२ रोजी पहाटे देवाज्ञा झाली असून ते वैकुंठस्थानी निघून गेले,'' असे निवेदन त्यांच्या कुटुंबीयांनी सकाळी जाहीर केले.

हेही वाचा: ‘RRR’ च्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता राम चरणकडून सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन

टी रामा राव यांनी तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. अमिताभ बच्चन ते श्रीदेवी, NTR आणि ANR पर्यंत त्यांनी भारतातील अनेक दिग्गजांसोबत चित्रपट केले आहेत. त्यांच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये नवरात्री, ब्रम्हचारी, इल्लालू, पंडनी जीवथम, अंधा कानून, नाचे मयुरी, मुकाबला इत्यादींचा समावेश आहे.दिग्दर्शनासोबतच त्यांनी श्री लक्ष्मी प्रॉडक्शन या बॅनरखाली तमिळ चित्रपटांची निर्मितीही केली. धिल, यूथ, अरुण, समथिंग समथिंग उनाकुम इनाकुम आणि मलाइकोटाई अशी काही त्यांच्या तमिळ चित्रपटांची यादी आहे.

Web Title: Veteran Director T Rama Rao Passes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..