‘RRR’ च्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता राम चरणकडून सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन |ram charan organises langar at golden temple post massive success of 'RRR' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ram charan organises langar at golden temple post massive success of 'RRR'

‘RRR’ च्या यशानंतर दाक्षिणात्य अभिनेता राम चरणकडून सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन

RRR Movie: दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR नं भारतीय चित्रपट (RR Rajamauli) क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तो म्हणजे 16 व्या दिवशीच या चित्रपटानं जगभरातून तब्बल हजार कोटींचा व्यवसाय केला आहे. (Entertainment News) अशी कामगिरी करणारा हा तिसरा भारतीय चित्रपट आहे. यापूर्वी राजामौली यांच्या बाहुबलीनं (Bahubali) देखील अशीच गौरवास्पद कामगिरी केली (Tollywood News) होती. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

हेही वाचा: प्राजक्ता माळीला चाहता म्हणतोय... 'ओगं माझं पिल्लू', एकाने तर चक्क...

या चित्रपटाला प्रचंड यश मिळत असतानाच अभिनेता राम चरण (ram charan) अनवाणी पायाने उपवास करताना दिसला. त्याने ४२ दिवसांचे अय्यप्पा स्वामींचे उपवास केले आहेत. त्याच्या या नम्रतेवर आणि ईश्वराप्रती असलेल्या आस्थेवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच आता त्याने सुवर्ण मंदिरात लंगरचे आयोजन केले. त्याच्या सत्कार्याची दाखल चाहत्यांनी घेतली असून अनेकांनी राम चरण विषयी गौरवाचे शब्द काढले आहेत. (ram charan organises langar at golden temple post massive success of 'RRR')

हेही वाचा: 'जमिनीवर राहायचे असेल तर..' पराभवानंतर शाहरुख खानची खास पोस्ट..

या लंगर आयोजनाविषयी राम चरण याची पत्नी उपासना हिने इंस्टाग्राम अकाउंटवरून माहिती दिली. सुवर्ण मंदिर या पवित्र स्थळी जाऊन लंगर आयोजन केल्याचा व्हिडीओ तिने पोस्ट केला आहे. रामचरण 'RC 15' या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने उपासनाने ही सेवा पूर्ण केली आहे. उपासना म्हणते “ ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून राम चरण यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लंगर सेवेचे आयोजन केले होते. ते सध्या चित्रीकरणात व्यस्त असल्याने मला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यामुळे माझ्या आत्म्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळाले. राम चरण आणि मी तुमच्या प्रेमाबद्दल कृतकृत्य आहोत, आणि आपले प्रेम नम्रतेने स्वीकारतो,' असे कॅप्शन तिने दिले आहे. यावेळी सुवर्ण मंदिर गुरुद्वारा समितीने उपासना यांना सुवर्ण मंदिराचे चित्र भेट दिले. या लंगर सेवेबद्दल चाहत्यांना माहिती होताच या निःस्वार्थ सेवेबद्दल त्यांनी रामचरण वर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title: Ram Charan Organises Langar At Golden Temple Post Massive Success Of

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..