esakal | राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता काळाच्या पडद्याआड
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता काळाच्या पडद्याआड

राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता काळाच्या पडद्याआड

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - ज्येष्ठ मल्याळम अभिनेते 'नेदुमुडी वेणू' (nedumudi venu) यांनी वयाच्या ७३ वर्षी केरळच्या एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या अभिनेत्याला पोटाशी संबंधित आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतेच , नेदुमुडी वेणू कोविड मधून बरे झाले होते. नेदुमुडी वेणू गेल्या काही महिन्यांपासून पोटाशी संबंधित आजारांशी झुंज देत होते आणि त्यावर त्याचे उपचार देखिल चालू होते. मात्र, अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना तातडीने केरळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले.

१९४८ साली नेदुमुडी वेणू यांचा जन्म झाला असून त्यांचे खरे नाव हे 'केसावन वेणुगोपाल' आहे. वेणूने पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. नंतर त्यांनी १९७८ मध्ये 'जी अरविंदनच्या थंबू' या चित्रपटांमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वेणूने अनेक दशकांच्या कारकिर्दीत ५०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अभिनया व्यतिरिक्त अनेक चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या आहे, तर एका चित्रपटाचे दिग्दर्शन ही त्यांनी केले आहे. वेणू यांनी त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सहा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार प्रात्त झाले आहेत. वेणूने आपल्या करिअरची सुरूवात थिएटरपासून केली होती आणि नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये प्रवेश केला.वेणूने काही तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.

चौराहेन' नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही तसेच त्यांनी काम केले. मल्याळम चित्रपट 'आनम पेनम' हा त्याचा शेवटचा रिलीज होता. ते मोहनलाल आणि प्रियदर्शनच्या मेगा-बजेट महाकाव्य 'मराकर: अरेबिकदलिन्ते सिंहम'च्या रिलीजची तयारी करत होते. त्याच्या काही प्रसिद्ध चित्रपटांमध्ये मार्गम, विदापरयुम मुंपे, थेमाविन कोम्बथ, ओरू मिन्नामिनुगिन्ते नुरंगुबेट्टम, थन्मात्रा, नॉर्थ २४ काथम, थानिए, अशा इतर अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अडचणीत

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

loading image
go to top