Daljeet Kaur Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री दलजीत कौर यांचे दीर्घ आजाराने निधन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

veteran Punjabi film actress Daljeet Kaur dies at 69

Daljeet Kaur Passes Away : ज्येष्ठ अभिनेत्री दलजीत कौर यांचे दीर्घ आजाराने निधन..

Daljeet Kaur Passes Away: काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक राकेश कुमार यांचे निधन झाले. ही दुःख अजूनही ताजे असतानाच मनोरंजन विश्वाला पुन्हा एक धक्का बसला आहे. पंजाबी चित्रपट विश्वातील लोकप्रिय आणि दिग्गज अभिनेत्री दलजीत कौर (Daljeet Kaur) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा: Ram Gopal Varma: त्याचे 70 तुकडे करावेत.. श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणी राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

दलजीत या पंजाबच्या चित्रपट विश्वातील एक दिग्गज अभिनेत्री. त्यांनी पंजाबी प्रादेशिक भाषेतील अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तसेच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही अभिनय केला आहे. दलजीत कौर यांनी 10 पेक्षा अधिक हिंदी आणि 70 पेक्षा जास्त पंजाबी चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा: Drishyam 2: तगडी स्टारकास्ट आणि कोटींचे मानधन! जाणून घ्या कुणी घेतले किती पैसे..

दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर दलजीत यांनी पुणे फिल्म इंस्टीट्यूटमध्ये प्रवेश घेतला. 1976 साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण पती हरमिंदर सिंह देओल यांच्या अपघाती निधनाने दलजीत कौर यांनी सिनेमात काम करणं बंद केलं. पतीच्या निधनानंतर त्या आजारी पडल्या. त्यानंतर 2001 साली त्यांनी पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक केलं. दलजीत कौर अनेक सिनेमांत आईच्या भूमिकेत दिसल्या आहेत. दलजीत कौर यांच्या निधनाने पंजाबी सिनेसृष्टी शोकाकुल झाली आहे.

दलजीत कौर एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबत कबड्डी आणि हॉकीच्या राष्ट्रीय खेळाडू होत्या. पंजाबी सिनेसृष्टीतील हेमा मालिनी म्हणून दलजीत कौर यांना ओळखले जायचे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले होते. त्या गंभीर आजाराशी झुंज देताना अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.