esakal | नऊ वर्षांपूर्वी 'विक्की' कसा दिसत होता माहितीये?
sakal

बोलून बातमी शोधा

vicky kaushal

नऊ वर्षांपूर्वी 'विक्की' कसा दिसत होता माहितीये?

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता विकी कौशलला (vicky kaushal) बॉलिवूमध्ये नऊ वर्ष पुर्ण झाली आहेत. विकी सोशल मीडियावर त्याच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो नेहमी शेअर करत असतो. नुकताच विकीने एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. विकीने त्याच्या पहिल्या ऑडिशनचा फोटो शेअर केला आहे. अनेकांनी विकीच्या या फोटोला कमेंट केल्या आहेत.(vicky kaushal completes 9 years in bollywood shares photo of first audition)

10 जुलै 2012 रोजी विकीने दिलेल्या पहिल्या ऑडिशनचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला. विकीने फोटो पोस्ट करण्यापुर्वी इन्स्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला होता. त्या स्टोरीमध्ये विकीने 'आज ९ वर्षांपुर्ण झाली. सर्वांचे आभार..' असे लिहीले. फोटोमध्ये विकीने पांढऱ्या रंगाचं टीशर्ट घातला असून हातात ऑडिशनचा बोर्ड धरला आहे. त्या बोर्डवर विकीची माहिती लिहीली आहे. हा फोटो शेअर करून विकीने त्याला कॅप्शन दिले, 'काही वर्षांपुर्वी मी झोपेत देखील ऑडिशनचा विचार करत होतो. देवाने माझी या प्रवासात साथ दिली.' विकीचा हा फोटो पाहून त्याचे अनेक चाहते आश्चर्यचकित झाले.

हेही वाचा: 'गंगुबाई काठियावाडी'ओटीटीवर नाहीच, थिएटरमध्येच होणार प्रदर्शित

2012 साली 'गॅग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटात विकीने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. त्यानंतर 2015 साली ‘मसान’ चित्रपटामधून विकीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे अनेकांनी त्याचे कौतुक केले. नंतर विकीने ‘संजू’, ‘राजी’, ‘उरी’, ‘मनमर्जिया’या चित्रपटांमध्ये काम केले. लवकरच विकी ‘इमोर्टल ऑफ अश्वत्थामा’, ‘सरदार उधम सिंह’ आणि ‘तख्त’ या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

हेही वाचा: 'पाहूण्यांना स्पर्धकांचं कौतूक करावचं लागतं', राहूलनं सांगितलं कारण

loading image