esakal | 'गंगुबाई काठियावाडी'ओटीटीवर नाहीच, थिएटरमध्येच होणार प्रदर्शित
sakal

बोलून बातमी शोधा

gangubai kathiyawadi

'गंगुबाई काठियावाडी'ओटीटीवर नाहीच, थिएटरमध्येच होणार प्रदर्शित

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या वेगळेपणासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (sanjay leela bhansali) प्रसिद्ध आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे खास असे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे भन्साळी यांचे सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गंगुबाई काठियावाडी (gangubai kathiyawadi) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्यात आलिया भट्ट ही प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता. त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसादही मिळाला. प्रसिद्ध पत्रकार हुसैन झैदी (hussain jhaidi) यांच्या माफिया क्वीन्स या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. (sanjay leela bhansali alia bhatt starrer gangubai kathiawadi will not be released on ott)

गंगुबाई काठियावाडी हा चित्रपट ओटीटी (ott paltfom) प्लॅटफॉर्मवरुन प्रदर्शित करायचा की थिएटरमध्ये सध्या वाद सुरु आहे. मात्र त्यावर या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी ठाम भूमिका घेतली आहे. ती म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची. त्यामुळे प्रेक्षकांना गंगुबाई काठियावाडी पाहण्यासाठी चित्रपटगृहात जावे लागणार आहे. वास्तविक हा चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहे. मात्र काहीही झालं तरी थिएटरमध्येच हा सिनेमा प्रदर्शित करण्यावर भन्साळी ठाम आहेत.

गेल्या काही दिवसांपासून आलियाचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्यावर दिग्दर्शकांनीच माहिती दिल्यानं प्रेक्षकांना त्याचे उत्तर मिळाले आहे. याबद्दलची अधिक माहिती स्पॉटबॉयनं दिली आहे. त्यात उल्लेख केल्यानुसार भन्साळी यांना हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करायचा आहे. कोरोनामुळे सध्या थिएटर बंद आहेत. मात्र ते उघडण्याचा निर्णय होईपर्यत आपण वाट पाहायला तयार आहोत. असेही भन्साळी म्हटल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: कॅन्सरशी झुंज अपयशी, मिमिक्री आर्टिस्ट माधव मोघे यांचे निधन

हेही वाचा: 'पाहूण्यांना स्पर्धकांचं कौतूक करावचं लागतं', राहूलनं सांगितलं कारण

भन्साळी यांचा हा सिनेमा मुंबईची कोणेएकेकाळची माफिया क्वीन गंगुबाई काठियावाडी यांच्यावर आधारित आहे. मुंबईतील कोठेवाली म्हणून त्या ओळखल्या जात. त्यांना त्यांच्या पतीनं पाचशे रुपयांसाठी विकलं होतं. या चित्रपटातून गंगुबाई काठियावाडी यांच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. लहानपणीच लग्न, त्यानंतर वाट्याला आलेलं जीवघेणं दु;ख उराशी घेऊन गंगुबाई यांची वाटचाल कशी झाली, हे चित्रपटाच्या माध्य़मातून दाखविण्यात आले आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

loading image