'कतरिनाशी झटपट लग्न व्हावं म्हणून मी...', विकी कौशलचा करण समोर मोठा खुलासा Vicky kaushal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vicky kaushal reveals his lovestory marriage inside details at koffee with karan

'कतरिनाशी झटपट लग्न व्हावं म्हणून मी...', विकी कौशलचा करण समोर मोठा खुलासा

Koffee with karan 7: करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7' मध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी आपल्या लग्नापासून हनिमूनपर्यंत ते अगदी सेक्स लाईफ पर्यंत अनेक मुद्द्यांवर मोठे खुलासे केले आहेत. याच शो मध्ये विकी कौशल(Vicky kaushal) आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील आता आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर खुलासे करताना दिसणार आहेत.(Vicky kaushal reveals his love story marriage inside details at koffee with karan)

हेही वाचा: 'दीया और बाती' फेम कनिष्का सोनीनं स्वतःशीच केलं लग्न; म्हणाली,'मला पुरुष..'

विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा प्रेम,लग्न याविषयी दिलखुलासपणे बोलत चाहत्यांचं मन जिंकून घेताना दिसतील असं बोललं जात आहे. आता करणच्या शो ची खासियत सगळ्यांनाच माहित आहे. येणाऱ्या सेलिब्रिटींच्या मनातलं जगासमोर आणण्याची ताकद या शोमध्ये आहे. बोललं जात आहे की विकी कौशल आणि कतरिनाच्या(Katrina kaif) लव्हस्टोरीचं(Love Story) पूर्ण क्रेडिट करण जहरने स्वतः घेतलं आहे. आणि चक्क विकीने देखील करणला हसत हसत सहमती दर्शवली आहे.

हेही वाचा: Liger: विजय देवरकोंडावर भडकले लोक; म्हणाले,'बंद कर सगळी नाटकं...'

या शो मध्ये विकी म्हणाला की, गेल्या सिझनमध्ये याच काऊचवर बसून मला कळलं की कतरिनाला मी अस्तित्वात आहे हे माहित आहे. त्यानंतर विकीनं खुलासा केला की तो पहिल्यांदा कतरिनाला झोया अख्तरच्या घरी भेटला. आपल्या लग्नाच्या दिवसाची आठवण काढताना विकी म्हणाला की लग्नाच्या धामधूमी दरम्यान आपल्या लग्नासंबंधित शेअर केल्या जाणाऱ्या बातम्या, मीम्स, मजेदार ट्वीट्स हे देखील आपण चेक करत होतो, माझं लक्ष त्या गोष्टींवर देखील होतं. सुरक्षेच्या कारणास्तव वापरण्यात आलेल्या ड्रोनपासून ते हेलिकॉप्टरमधून केलेली एन्ट्री हे सगळं भारावणार होतं,असं विकी म्हणाला.

हेही वाचा: 'आपला एखादा मित्र सोडून गेल्यावरती...'; जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट चर्चेत

त्याचबरोबर विकी कौशलनं आपल्या लग्नाविषयी एक मोठा खुलासा करत म्हटलं आहे की,''मी लग्नादिवशी पंडितजींना लग्न पटापट आवरण्याच्या सूचना देत होतो. एका तासापेक्षा जास्त वेळ लग्नाला लावू नका असं मी त्यांना चक्क बजावल होतं''. विकी पुढे म्हणाला,''लग्नाच्या वेळी माझं जास्त लक्ष आमच्या लग्नासंदर्भात होणाऱ्या मीम्स,ट्वीट्स,मेसेजेसवर होतं. आमचे मित्र आम्हाला ते वाचून दाखवत होते,आणि यात एक वेगळी गम्मत होती''.

हेही वाचा: सचिनचं पहिलं लग्न झालंय म्हणून सुप्रियाने नकार दिला होता? जाणून घ्या लव्हस्टोरी

कॉफी विथ करणच्या यंदाच्या सिझनमध्ये विकी कौशलने आपल्या लग्नाविषयी, लव्ह लाईफविषयी इतरही अनेक मोठे खुलासे केले आहेत. तसंच,सिद्धार्थ मल्होत्रानं देखील करणच्या या शो मध्ये कियारा अडवाणीसोबतच्या आपल्या नात्याची कबूली दिली आहे. करणने तर थेट त्याला कियारा सोबत लग्न करणार का असाच प्रश्न विचारला. तेव्हा सिद्धार्थने उत्तर तर दिलं नाही पण नकारही दर्शवला नाही. हो, सिद्धार्थ मल्होत्रा या प्रश्नावर लाजला मात्र झकास.

हेही वाचा: डॅडी v/s शकील; 'दगडी चाळ 2' सिनेमातील नव्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

हा मजेदार एपिसोड येत्या गुरुवारी टेलिकास्ट होणार आहे. याआधी करण जोहरच्या शो मध्ये आमिर खान,करिना कपूर खान,रणवीर सिंग,आलिया भट्ट,विजय देवरकोंडा,अनन्या पांडे,सारा अली खान,जान्हवी कपूर,अक्षय कुमार,समंथा गेस्ट म्हणून हजर राहिले होते.

Web Title: Vicky Kaushal Reveals His Lovestory Marriage Inside Details At Koffee With

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..